Online | Photo Credits: Pixabay.com

महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरस लॉकडाऊनने शैक्षणिक वर्षाचं देखील गणित बिघडलं आहे. शाळा- महाविद्यालयं बंद असल्याने विद्यार्थ्यांना थेट शाळेत जाण्याऐवजी घरातूनच ऑनलाईन पद्धतीने शिक्षण उपलब्ध करून देण्याचे आदेश आहे. मात्र या परिस्थिस्तीमध्ये अनेक ठिकाणी शाळा व्यवस्थापनाकडून फी न भरल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर ठेवले जात आहे. असाच एक प्रकार दिल्ली पब्लिक स्कूल - पनवेल ( DPS Panvel) शाळे मध्येही झाल्याचं वृत्त आहे. दरम्यान पालकांनी या विरूद्ध आवाज उठवत ट्वीटरच्या माध्यमातून शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे दाद मागितली आहे.

दरम्यान ट्वीट मध्ये देण्यात आलेल्या माहिती नुसार, DPS Panvel च्या पालकांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि सरकार मधील अधिकार्‍यांना टॅग करत न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. सोबतच फी भरली नसल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लास मध्ये सहभागी करून घेतले जात नसल्याचा प्रकार अन्यायकारक असल्याचं म्हटलं आहे. Coronavirus: शिक्षण संस्थांनी शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये विद्यार्थ्यांना वाढीव शुल्क आकारु नये- शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड.  

संतप्त पालकांचे ट्वीटस 

महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार, देशातील कोरोनाची स्थिती पाहता यावर्षी पालकांकडून पूर्ण फी घेऊ नये, त्यांना सवलती द्याव्यात तसेच विद्यार्थ्यांना फीच्या कारणावरून ऑनलाईन शिक्षणापासून दूर ठेवता येणार नाही असे निर्देश दिले होते. मात्र त्यांचं उल्लंघन महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी होताना दिसत आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आता 30 सप्टेंबर पर्यंत शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लास बंद ठेवण्याचे आदेश मिशन बिगिन अगेनच्या नव्या नियमावलीमध्ये दिले आहेत.