Coronavirus: शिक्षण संस्थांनी शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये विद्यार्थ्यांना वाढीव शुल्क आकारु नये- शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
Education Minister Varsha Gaikwad (PC - Twitter)

राज्यातील कोरोना व्हायरस (Coronavirus) आणि लॉकडाऊन (Lockdown) स्थिती विचारात घेऊन राज्यातील शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांना प्रवेश देताना वाढीव शुल्क आकारु नये, असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (School Education Minister Varsha Gaikwad) यांनी म्हटले आहे. शिक्षणमंत्र्यांनी दिलेले आदेश हे शैक्षणिक वर्ष 2020-21 ( Academic Year 2020-21) साठी लागू असून, ते राज्यातील सर्व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संस्थांना लागू असतील.

शुल्कवाढीच्या संबंधात काही तक्रारी असल्यास संबंधित पालकांनी आपल्या जिल्ह्याच्या संनियंत्रकाशी संपर्क साधावा, असे अवाहनही वर्षा गायकवाड यांनी केले आहे. (हेही वाचा, महाराष्ट्रात विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रम आयोजनाकरिता दूरदर्शनवर 12 तास, रेडिओसाठी 2 तासांचा स्लॉट उपलब्ध करून द्या-शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची केंद्र सरकारकडे मागणी)

वर्षा गायकवाड ट्विट

दरम्यान राज्यातील शाळांवर कोरना व्हायरस संकटाचे सावट आहे. त्यामुळे राज्यातील शाळा इतक्यात सुरु होणे जवळपास कठीण आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांना आपल्या पाल्याच्या भविष्याची चिंता सतावात आहे. पालकांची भावना विचारात घेऊन राज्य सरकारने टीव्ही आणि रेडिओवरून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी दूरदर्शनचे 12 तर रेडिओचे 2 तास असा कालावधी राज्य सरकारला मिळावा अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.