Mumbai: देशभरासह राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याच्या पार्श्वभुमीवर राज्य सरकार त्याचा सामना करण्यासाठी सज्ज झाले आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक फटका बसू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यासाठी लहान मुलांना जर क्वारंटाइन करण्याची वेळ आली तर त्यांच्यासाठी खास व्यवस्था सुद्धा करण्यात आले आहेत. याच पार्श्वभुमीवर मुंबई महापालिकेने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.(Thane: गणेशोत्सवादरम्यान ठाणे येथील लसीकरण पाच दिवस बंद राहणार)
तिसऱ्या लाटेत मुलांना जर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले तर पालकांनी काय करावे यासाठी महापालिकेने निर्णय घेतला आहे. त्यानुसार, पालकांना जंम्बो कोविड उपचार केंद्रात राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये ज्या पालकांना कोरोनाची लागण झाली नसेल त्यांना काही अंतरावर रहता येणार आहे. तर ज्या पालकांसह मुलांना कोरोना झाला आहे त्यांनी एकत्रित राहता येणार आहे.(Covid-19 Third Wave: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंबंधित केलेल्या वक्तव्यावर महापौर किशोरी पेडणेकर यांचे स्पष्टीकरण)
पालकांना मुलांसोबत राहण्यासाठी मुलुंड, बीकेसी आणि दहिसर येथील कोरोना उपचार केंद्रात व्यवस्था करण्यात आली आहे. तर मुलाला जर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यास त्याच्या सोबत एका पालकाला राहता येणार असल्याचे ही महापालिकेने म्हटले आहे. पालकांसह मुलांची गैरसोय होऊ नये म्हणून पूर्णपणे व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान, बुधवारी मुंबईत कोरोनाचे आणखी 532 रुग्ण आढळले आहेत. 15 जुलै नंतर समोर आलेली ही आकडेवारी सर्वाधिक आहे. तर 15 जुलैला 528 रुग्ण आढळले होते. त्यानंतर दिवसागणिक कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत होती. दुसऱ्या बाजूला प्रशासनाने पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यास मनाई केली आहे. त्यांनी म्हटले की, आम्ही परिस्थितीवर नजर ठेवून आहोत. त्याचसोबत गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढण्याची भीती ही व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन वारंवार महापालिकेकडून केले जात आहे.