Param Bir Singh's Letter: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारसह शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. पत्रकार परिषदेवेळी फडणवीस यांनी म्हटले की, सचिव वाझे यांची पुन्हा पोलीस दलात वापसीसाठी दिलेली मंजूरी ही परमबीर सिंह यांनी दिली आहे. परंतु हे अर्धसत्य आहे. सरकारला नियमांबद्दल काही माहिती नाही का? सरकार झोपले होते का? एखाद्या व्यक्तीला निलंबित केल्यानंतर त्याला पोलिसांच्या मुख्य पदावर कसे बसवू शकतात. या प्रकरणी डीजीपीची तपासणी माजी कमिशनर करु शकतात. खरंतर शरद पवार यांनी असे म्हटले होते की, या प्रकरणी जुलिओ रिबेरो च्या माध्यमातून याचा तपास केला जाईल. जुलिओ रिबेरो महाराष्ट्रात चर्चेत ठरलेले आणि कोणतेच आरोप नसलेले पोलीस अधिकारी आहेत.
फडणवीस यांनी पुढे असे म्हटले की, वाझे यांना परमबीर यांच्या कमेटीने जरुर पोलिसात दाखल केले आहे. पण हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या सांगण्यावरुन झाले आहे. शरद पवार हे सांगणे विसरले वाटतं. रिबेरो यांच्या मार्फत तपास करण्याबद्दल फडणवीस यांनी म्हटले, प्रश्न असा आहे तपास परमबीर सिंह यांचा होणार आहे की संपूर्ण घटनेचा केला जाणार आहे.(Devendra Fadnavis on Sharad Pawar: शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकार तयार केले म्हणूनचं ते त्यांचा बचाव करत आहेत - देवेंद्र फडणवीस)
पत्रकार परिषदेदरम्यान फडणवीस यांनी असे म्हटले की, पोलिसांचे डीजीपी राहिलेले सुबोध जयस्वाल यांनी सरकारकडे एक रिपोर्ट सुपूर्द केला होता. त्यात असे होते की, पोलिसांची बदली आणि प्रमोशनसाठी मोठ्या प्रमाणात पैशांची देवाणघेणा होत आहे. हा रिपोर्ट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचला होता. त्यानंतर तो गृहमंत्र्यांकडे गेला आणि तेव्हाच या रिपोर्टवर कोणतीही कारवाई केली गेली नाही. सुबोध जयस्वाल सारखे प्रामाणिक अधिकारी ज्यांनी महाराष्ट्रातून केंद्रात डेप्युटेशन घेतले आहे. ते आता दिल्लीत सीआयएसएफचे प्रमुख असून त्यांनी हा रिपोर्ट दिला होता. ट्रान्सफर आणि प्रमोशनचे रॅकेट चालत होते. ज्यामध्ये कोणतीही कारवाई केली गेली नाही. यामध्ये महाराष्ट्र सरकारचे गृहमंत्र आणि त्यांच्या कार्यालयाचे नाव येत आहे.
तर परमबीर सिंह यांनी गंभीर आरोप लावले आहेत. परंतु उद्धव ठाकरे कोणत्याही किंमतीत आपले सरकार वाचवू पाहत आहे. त्यांनी वाझे यांना पुन्हा एकदा परमबीर सिंह यांच्या कमिटीने सामिल केले पण जेव्हा त्यांना महत्वाची जबाबदारी दिली होती त्यावेळी ते सरकार झोपले होते का? तेव्हा सरकारला नियम माहिती नव्हते का? सरकारला नियम माहिती होते तरी सुद्धा वाझे यांना मुख्य पद का दिले गेले? हे सरकारच्या आशीर्वादाशिवाय कसे होऊ शकते.