Maharashtra Home Minister Anil Deshmukh यांची CBI चौकशी करण्याच्या मागणीसाठी Param Bir Singh यांची Supreme Court मध्ये धाव
Anil Deshmukh and Parambir Singh | Photo Credits: ANI

माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) विरूद्ध महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Maharashtra Home Minister Anil Deshmukh) हा सामना आता न्यायालयापर्यंत पोहचला आहे. आज (22 मार्च) दिवशी परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्याविरूद्ध सीबीआय चौकशी व्हावी या मागणीसाठी त्यांनी सुप्रिम कोर्टात धाव घेतली आहे. 17 मार्च दिवशी अनिल देशमुखांची मुंबई पोलिस आयुक्तपदावरून त्यांची उचलबांगडी करून गृह रक्षक दलामध्ये बदली करण्यात आली आहे. याच बदलीवरून आता सिंह विरूद्ध देशमुख सामना, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहे.

दरम्यान परमबीर यांच्या बदलीमागे त्यांनी अनिल देशमुखांच्या काही गैरकृत्यांची महाविकास आघाडीमधील नेत्यांना सांगितलं असल्याचं त्यांचं मत आहे. सिंह यांनी गृहमंत्र्यांच्या सीबीआय चौकशीसोबत त्यांच्या मुंबईतील घरातील सीसीटीव्ही फूटेज देखील तपासले जावे अशी मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या याचिकेमध्ये त्यांनी पोलिस दलातील गैरव्यवहार आणि बदल्यांमधील राजकारणाचा प्रश्न उपस्थित केला आहे.

सर्वोच्च न्यायालयामध्ये परमबीर सिंह यांचं प्रकरण लिस्ट झाल्यानंतर त्यांची बाजू ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी मांडणार आहेत. आज परमबीर सिंह यांनी मुंबई मधील कार्यालयामध्ये DG Homeguard पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. Parambir Singh Letter Bomb: माजी मुंबई पोलिस आयुक्तांनी अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांत तथ्य नाही शरद पवार यांचा बचाव तर BJP कडून 'होम क्वारंटाईन' मध्ये पत्रकार परिषद कशी? चा सवाल.

काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमामध्ये बोलताना परमबीर सिंह यांच्याबाबत काही अक्षम्य चूका समोर आल्याने त्यांची बदली करत असल्याचं म्हटलं आहे. तर परमबीर सिंह यांनी या नंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत फेब्रुवारीच्या मध्यावर सचिन वाझेंना गृहमंत्र्यांनी बोलावून पैसे वसुलीचं टार्गेट दिल्याची माहिती काही पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्याचा उल्लेख केला आहे. आता यावरूनच सध्या महाराष्ट्रात राजकारणही तापत आहे.