राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गणेश कराड (Ganesh Karad) यांच्यासह 4 जणांनी परळी येथील एका व्यापाराला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. परळी शहरात येणे मार्केटमध्ये घडलेल्या या फ्री स्टाईल मारहाणीचा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. व्यापारी अमर देशमुख (Amar Deshmukh) यांना मारहाण करणारे हे राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते आणि समाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे समर्थक आहेत, अशी चर्चा सर्वत्र आहे. यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी ट्विटरच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. गुंडाचे आत्मबल वाढवणारे पाकलक्त आमच्या बीडला मिळाले आहे. हे दुर्दैव आहे. तसेच हे खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना दिला आहे.
परळी येथील व्यापारी अमर देशमुख यांच्यावर दिवसा ढवळ्या लाठीकाठीने बेदम मारहाण करत प्राणघातक हल्ला करण्यात आला. या घनटेचा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी अशा घटनांमध्ये कोणाचीही गय केली जाणार नाही, असे अश्वासन दिले होते. तर या घटनेचा निषेध करत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे याच्यावर निशाणा साधला आहे. "परळीत गुंडागर्दी, हफ्तेखोरी ,माफिया राज करायचं आणि पोलिसांनी कर्तव्य बजावल्यावर ,गुन्हे दाखल झाल्यावर मग 'गय करणार नाही 'अशी भाषा करायची हे दुटप्पी धोरण...गुंडांचे आत्मबल वाढवणारे पालकत्व आमच्या बीडला मिळाले हे दुर्दैव...हे खपवून घेतले जाणार नाही. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात परळी येथे व्यापारी आणि सामान्य जनतेवर अन्याय जनतेने केलेले बंद ही परिस्थिती तर छत्रपतींच्या संस्कारांची पायमल्ली..सर्वत्र खेद आणि तीव्र संताप व्यक्त होत आहे, असे पंकजा मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. यावर धनंजय मुंडे यांनी अद्याप कोणतीही प्रतिकिया दिलेली नाही. हे देखील वाचा- आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची प्रकृती बिघडली; उपचारांसाठी मुंबईमधील लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल
पंकजा मुंडे यांचे ट्वीट-
परळीत गुंडागर्दी, हफ्तेखोरी ,माफिया राज करायचं आणि पोलिसांनी कर्तव्य बजावल्यावर ,गुन्हे दाखल झाल्यावर मग 'गय करणार नाही 'अशी भाषा करायची हे दुटप्पी धोरण ..गुंडांचं आत्मबल वाढवणारं पालकत्व आमच्या बीड ला मिळालं हे दुर्दैव..हे खपवून घेतलं जाणार नाही ..
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) February 18, 2020
पंकजा मुंडे यांचे ट्वीट-
शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात परळी येथे व्यापारी आणि सामान्य जनतेवर अन्याय जनतेने केलेलं बंद ही परिस्थिती तर छत्रपतींच्या संस्कारांची पायमल्ली..सर्वत्र खेद आणि तीव्र संताप व्यक्त होत आहे..
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) February 18, 2020
गणेश कराड आणि अमर देशमुख यांच्यामध्ये संपत्तीवरुन वाद सुरु होता. या वादाचे रुपांतर हाणामारीमध्ये झाले. यामधूनच कराड यांच्या सहकाऱ्यांनी देशमुख यांना मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. कराड यांनी काठ्या आणि रॉडने देशमुखांवर हल्ला केला. जखमी झालेल्या देशमुख यांच्यावर परळीच्या शसकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, मुंडे समर्थकांनी टॉवर चौकामधील गाड्यांची तोडफोड केली आणि सार्वजनिक मालमत्तेची नासधूसही केली. कराड हे मुंडेचे जवळचे कार्यकर्ते समजले जातात. देशमुख यांना मारहाण करणाऱ्या गणेश कराड आणि त्यांच्या चार सहकाऱ्यांविरोधात संभाजी नगर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.