Electric Shock | (Photo Credit: Archived, edited, representative images)

राज्यात अत्यंत उत्साहात पार पडलेल्या गणेशोत्सवाचा आजचा शेवटचा दिवस. अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने सार्वजनिक गणपतीचे आज विसर्जन करण्यात आले. दरम्यान, गणेश विसर्जन करताना एकाच वेळी तब्बल 11 जणांना विजेचा धक्का (Electrical Shock) बसला. पनवेल (Panvel) शहर पोलिस ठाणे हद्दीत उरण नाका (Uran Naka) येथील वडघर खाडी (Vadghar Creek) किनारी सुरु असलेल्या गणपती विसर्जनावेळी आज (9 सप्टेंबर) सायंकाळी ही घटना घडली. या ठिकाणी कोणतीही जीवीत हानी झाली नाही. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करणयात आले. एकूण जखमींपैकी 10 जण हे एकाच कुटुंबातील आहेत.

पनवेल येथे वडघर खाडी किनाऱ्यावर दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन सुरु होते. या वेळी भाविक गणपती विसर्जनात मग्न होते. अचानक 11 जणांना विजेचा धक्का (Electrocuted ) बसला. जखमींना पनवेलमधील वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार एकूण जखमींपैकी सर्वम पनवेलकर, तनिष्का पनवेलकर, दिलीप पनवेलकर, निहार चोणकर, दीपाली पनवेलकर, वेदांत कुंभार, दर्शना शिवशिवकर, प्रसाद पनवेलकर या 6 जणांना पनवेल उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. हर्षद पनवेलकर व मानस कुंभार या दोघांना लाईफ लाईन हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आले आहे. रुपाली पनवेलकर हिच्या आणखी दोघांना पटवर्धन हॉस्पिटल आणि दुसऱ्या एकाला हॉस्पीटल पनवेल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (हेही वाचा, Thane: ठाण्यात चार वर्षाच्या मुलाचा ओव्हरफ्लो नाल्यात वाहून गेल्याने मृत्यू)

पनवेलमधील वडघर कोळीवाडा येथे विसर्जन घाट आहे. या ठिकाणी गणपती विसर्जन करताना भक्तांना उजेड मिळावा यासाठी जनरेटरची व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान, पाऊसही मोठ्या प्रमाणावर सुरु झाला. त्यामुळे जनरेटरची एक वायर तुटून मानस कुंभार नामक तरुणाच्या अंगावर पडली. यावेळी त्याला शॉक लागला. तोड तडफडताना पाहून कुटुंबीयांनी मदत करण्याच्या भावनेने त्याला स्पर्ष केला. या वेळी कुटुंबीयांनाही विजेचा धक्का बसला.