विठ्ठल मंदिर पंढरपूर (Photo credit : Youtube)

प्रतिवर्षी प्रमाणे जूनमध्ये सुरु होणाऱ्या आषाढी वारीतील (Aashadhi vari) वारकऱ्यांना यंदा विठुरायाच्या चरणी पोहचताच मंदिराचं बदलेलं रूप पाहायला मिळणार आहे.प्रदूषणाला आळा घालण्यासाठी देशभरात चालू असलेल्या प्रयत्नांना हातभार म्हणून पंढरपूरच्या (Pandharpur) विठ्ठल- रखुमाई मंदिराच्या (Vithhal-Rukmini Temple) समितीने येत्या काही दिवसात मंदिराला 'ग्रीन टेम्पल' (Green Temple) बनवण्याचा ध्यास घेतलाय. या प्रकल्पच्या अंतर्गत मंदिरातील वापर नसलेल्या भागांमध्ये तसेच मंदिराच्या बाहेर वेगवेगळी झाडे लावण्यात येणार आहेत. Ashadhi Ekadashi Pandharpur Wari 2019: संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी 2019 वेळापत्रक जाहीर

सुरवातीला हडपसरच्या (Hadapsar, Pune) एका राजेश्वरी नर्सरीचे मालक आर. व्ही. हिरेमठ यांनी समितीला मंदिराच्या आवारात लावण्यासाठी 350 झाडे आणि कुंड्या मोफत दिल्या होत्या याची संख्या वाढून आतापर्यंत साधारण 500  झाडे लावण्यात आली आहेत. या संपूर्ण प्रकल्पसाठी सुमारे 5 लाख 50 हजारांवर खर्च जाणार असल्याचे समजत आहे.

मंदिराच्या अंतर्गत भागांमध्ये नागफणी, झेनाडो, बायगस म्हणजेच सावलीतील वडाचे झाड, मनीप्लँट, टीलोडेंड्रॉन या झाडांची रोपं लावण्यात येणार आहे.ही सर्व झाडे अधिक प्रमाणात ऑक्सिजन निर्माण करणारी म्हणून ओळखली जातात. याशिवाय या सर्व रोपांची वाढ अतिशय संथ असल्याने बंदिस्त जागेत देखभाल करणे देखील सोप्पे असते. तर मंदिराच्या बाहेरील बाजूस उन्हात थंडावा देणारी आरेकापाम, पायकस ब्लँकीयाना आणि (रंगीबेरंगी) बोगन व्हेल ही पंधरा ते वीस फूट उंच होणारी रोपे लावण्यात येणार आहेत.

विविध रोपांच्या कुंड्यांमुळे मंदिराच्या सौंदर्यात भर पडत असून प्रदूषणावर नियंत्रण बसण्यास मोठी मदत होईल. दरवर्षी विठलाच्या मंदिरात लाखो भाविक मोठया श्रद्धेने येत असतात त्यांना इथे आल्यावर एक आरोग्यदायी पर्यावरण पूरक वातावरण निर्माण करून देण्याच्या हेतूने हा निर्णय घेण्यात आल्याचे मंदिराच्या समिती कडून सांगण्यात येत आहे.