Pandharpur News: विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूर परिसरात भाविकांना फसवून त्यांच्या कडून पैसे लूबाडून एजेटचा वावर असतो. दर्शन लवकर करून देत्या त्यासाठी त्या एजेटला काही पैसे द्यावे लागतात. असं काहीस पंढरपूरात घडलं. एजेट पैसे घेत असताना पोलीसांच्या हाती सापडला. श्रावण अधिक मास लाचू असताना पंढरपूरात भाविकांची असंख्य गर्दी पाहायला मिळते. गर्दीला टाळण्यासाठी दोन भाविक पंढरपूरात आले असताना त्यांच्या कडून एजेंटने दोन हजार रुपयांची मागणी केली. हा सर्व प्रकार पोलीसांच्या कानी येताच पंढरपूर शहरातील पोलीस सर्तक झाले.
हैद्राबाद वरून आलेले भाविकांनी ज्या हॉटेलमध्ये उतरले होते त्या हॉटेल व्यवस्थापकाला झटपट दर्शनाबाबत विचारल्यावर त्यांनी शंतनू उत्पात याचा नंबर दिला होता. नंतर या उत्पात याने सागर बडवे यास जोडून दिल्यावर या दोन भाविकांना घेऊन सागर बडवे मंदिरात गेला आणि त्याने मंदिरातील संबंधिताला सांगून या दोघांना दर्शनाला पाठवले. या संबंधी पोलीसांना संशय आल्यावर पोलीसांनी विचारना केल्यावर हा सगळा प्रकार उघडकीस आला.
पोलीसांनी हा सगळा प्रकार वरिष्ठांच्या कानी घातला. त्याचसोबत पंढरपूर मंदीराच्या व्यवस्थापनाला देखील सांगण्यात आला आहे. परिसरात ही घटना समजतात खळबळ उडाली आहे. त्यामुळे इतर भाविकांनी देखील या घटनेची कारवाई केली पाहिजे अशी मागणी केली आहे. नेक एजंट विविध हॉटेलमधील भाविकांना अशा पद्धतीने पैसे घेऊन दर्शन घडवीत असल्याचे आरोप सातत्याने होत आले आहेत.