पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी लागलेल्या पोटनिवडणुकीसाठी (Pandharpur-Mangalvedha by-Election 2021) आज मतदान पार पडत आहे. आज सकाळी 8 वाजलेपासून मतदानास सुरुवात झाली. एकूण 524 मतदना केंद्रांवर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. मतदारसंघात एकूण 3 लाख 40 हजार 889 मतदार आहेत. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) , भाजप (BJP) आणि स्वभिमानी शेतकरी संघटना अशी तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. महाविकासआघाडी तर्फे दिवंगत भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके, भाजपकडून समाधान अवताडे तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सचिन पाटील असे तिन प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत. शिवाय शैला गोडसे यांनीही अपक्ष अर्ज भरला आहे. त्यामुळे आता ही निवडणूक चौरंगी होईल असे बोलले जात आहे.
राज्यात कोरोना व्हायरस संसर्गाचा कहर सुरु असताना निवडणूक आयोगाकडून ही निवडणूक जाहीर करण्यात आली होती. या निवडणुकीत कोरोना व्हायरस नियमांचा सऱ्हास भंग होताना दिसला. सत्ताधारी आणि विरोधक अशा दोघांकडूनही या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर गर्दी जमविण्यात आली. अत्यंत चुरसीच्या आणि प्रतिष्ठच्या अशा या निवडणुकीत कोण बाजी मारतं हे निकालादिवशीच कळणार आहे. आज मात्र उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होत आहे. (हेही वाचा, Pandharpur by-Election 2021: पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी महत्त्वाची, महाराष्ट्र भाजपवर होऊ शकतो दुरगामी परिणाम)
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक 2021 मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा दोन्ही पक्षांनीक जोर लावल्याचे पाहायला मिळाले. पोटनिवडणूक असली तरीही या निवडणुकीला अत्यंत महत्त्व देण्यात आले. नव्हे नव्हे राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून ह निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली. भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आदी मंडळींकडून काहीशी अधिकच. या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि चंद्रकांत पाटील यांनी पंढरपूर, मंगळवेढा येथे तळ ठोकलेला दिसला. तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar), जयंत पाटील यांनीही या मतदारसंघातील मुक्काम अधिक वाढवल्याचे पाहायला मिळाले. दोन्ही पक्षांनी लावलेला जोर पाहता ही निवडणूक नक्कीच किती महत्त्वाची आहे हे लक्षात येते. या निवडणुकीचे परीणाम दुरगामी असतील.