Palghar News: पालघर सूर्या नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू
Drowning प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

पालघरमधील सूर्या नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू . पालघरच्या कीराट जवळ ही दुर्घटना घडली. दोघंही तरुण बोईसरच्या इको एडनशी पार्क येथील रहिवाशी आहेत. सूर्या नदीत अंघोळीसाठी गेले असता दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे तर एकाला सुखरूप बाहेर काढण्यात स्थानिकांना यश आलं आहे. दुपारच्या सुमारास नदी पात्रात पोहत असताना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने यातील दोन मुले बुडाली.  पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा देखील केला आहे. (हेही वाचा - Maharashtra Unseasonal Rain: अवकाळी पावसानं विदर्भासह मराठवाड्याला झोडपलं, बीडमध्ये 500 कोंबड्यांचा मृत्यू)

बोईसर मधील इको एडन सिटी येथे राहणारी तीन मुले माकड चोळा जवळील सूर्या नदीत पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी गेली होती. त्यापैकी एका मुलाला वाचवण्यात यश आले असून दोन मुले बेपत्ता झाली. यातील दोन मुलांचे मृतदेह मिळाले आहेत. या घटनेची खबर मिळताच बोईसर पोलीस घटनास्थळी पोहोचले व स्थानिकांच्या मदतीने शोधकार्य केले.