भाजप आमदार राम कदम (BJP MLA Ram Kadam) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पालघर येथे झालेल्या तीन साधूंच्या हत्येप्रकरणी (Palghar Mob Lynching Case) राम कदम (Ram Kadam) हे जनआक्रोश यात्रा (Jan Aakrosh Yatra) काढणार होते. 'खार' घर ते पालघर अशी यात्रा राम कदम काढणार होते. तत्पूर्वीच मुंबई पोलिसांनी कदम यांना त्यांच्या खार येथील राहत्या घरुन ताब्यात घेतले आहे. राम कदम यांच्यासोबतच त्यांच्या घराबाहेर जमलेला 100 ते 150 कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. (हेही वाचा, Jaysingrao Gaikwad Quits BJP: मराठवाड्यात भाजपला मोठा धक्का; माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांची पक्षाला सोडचिठ्ठी)
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना आमदार राम कदम म्हणाले की, आम्ही केवळ आमच्या हातात दिवे घेऊन जाणार होतो. अत्यंत शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करणार होतो. तरीसुद्धा सरकारने आम्हाला ताब्यात घेतले आहे. सरकार दडपशाहीच्या मार्गाने आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करते आहे. परंतू, आम्ही आमचा आवाज दाबला जाऊ देणार नाही, असे राम कदम यांनी म्हटले आहे.
लॉकडाऊन काळात 16 एप्रिल 2020 च्या रात्री पालघर येथे जमावाने एकत्र येत तीन साधून आणि त्यांचा वाहनचालक अशा चौघांची हत्या केली होती. या हत्याकांडाला 211 दिवस पूर्ण झाले त्याबद्दल राम कदम हे जन आक्रोश रॅली काढणार होते. या हत्याकांडाची चौकशी महाराष्ट्र सरकारने सीबीआयकडे द्यावी अशी मागणीही राम कदम यांनी केली होती.
Maharashtra: BJP MLA Ram Kadam and his supporters detained by Police from outside his residence in Mumbai. They were taking out a 'Jan aakrosh yatra' to Palghar demanding CBI probe into Palghar mob lynching case. pic.twitter.com/rYUxFKOV71
— ANI (@ANI) November 18, 2020
दरम्यान, पालघर येथे साधुंच्यू हत्येवरुन राजकारणही रंगले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करुन प्रकरणाची माहिती घेतली होती. तर महाराष्ट्र पोलिसांनीही वेळीच कारवाई करत मोठ्या प्रमाणावर आरोपींना अटक केली होती. या प्रकरणाचे पडसाद राष्ट्रीय स्तरावरही उमटले होते. अनेक केंद्रीय नेत्यांनीही या प्रकरणाबाबत प्रतिक्रिया दिल्या होत्या.