Palghar Mob Lynching Case: पालघर मधील मॉब लिंचिंग प्रकरणी अटक करण्यात आलेल्या 47 आरोपींना आज जामीन देण्यात आला आहे. जिल्हाचे न्यायाधीश पीपी जाधव यांनी आरोपींना प्रत्येक 15 हजार रुपयांच्या जामीनावर सोडण्यात आले आहे. गेल्या महिन्यात कोर्टाने या प्रकरणी 58 आरोपींना जामीन दिला होता. पालघर मधील साधूंसह त्यांच्या ड्राव्हरच्या हत्येप्रकरणी जवळजवळ 200 लोकांना अटक करण्यात आले होते.(पालघर मॉब लिंचिंग घटनेतील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्या- रामदास आठवले)
वकील अमृत अधिकारी आणि अतुल पाटील यांनी कोर्टात अर्ज दाखल असे करत म्हटले की, या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांचा काहीच सहभाग नाही आहे. त्यांच्यावर संशय असल्याने अटक करण्यात आल्याचे वकिलांनी कोर्टाला सांगितले.(Palghar Mob Lynching Case: पालघर मधील मॉब लिंचिग प्रकरणी 54 आरोपींना कोर्टाकडून जामिन मंजूर)
Tweet:
#पालघर हत्याकांड प्रकरणात आज ४७ आरोपीना ठाणे न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. आज आरोपी पक्षाचे वकील अमृत अधिकारी यांनी न्यायालयात आरोपींची बाजू मांडली.@InfoPalghar @MahaDGIPR
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) December 7, 2020
16 एप्रिल 2020 रोजी पालघर येथे चिकने महाराज कल्पवृक्षगिरी आणि सुशीलगिरी महाराज यांच्यासह त्यांचा ड्रायव्हर निलेश तेलगडे यांची पालघरमध्ये हत्या करण्यात आली. हे दोन साधु त्यांच्या ड्रायव्हरसह गुजरातकडे अत्यंसंस्कारासाठी जात होते. मात्र पालघर येथील जमावाने ते मुल पळवणारी टोळी असल्याचे समजत त्यांना अमानुष मारहाण केली. या मारहाणीत दोन साधुंसह त्यांच्या ड्रायव्हरचा मृत्यू झाला. पालघर हत्याकांड प्रकरणी सीआयडीकडून चार्जशीट दाखल करण्यात आले. तर या प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून आले होते. सोशल मीडियात ही या प्रकरणाचा निषेध करण्यात येत होता.