Palghar Mob Lynching Case: पालघर मध्ये दोन साधू आणि त्यांच्या ड्रायव्हरची जमावाकडून हत्या करण्यात आल्याची घटना एप्रिल महिन्यात घडली होती. याप्रकरणी शंभरहून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर ताज्या अपडेटनुसार, ठाण्यातील विशेष सत्र न्यायालयाने यामधील 54 आरोपींना जामिन दिला आहे. प्रत्येक आरोपीने 15 हजार रुपयांचा दंड भरत जामिन मिळवला आहे. या सर्वांना जिल्हाधिकारी न्यायाधीश पीपी जाधव यांनी जामिन दिला आहे.(Palghar Mob Lynching Case Update: पालघर मधील साधू हत्याकांड प्रकरणी 2 पोलिस कर्मचार्यांना सक्तीची निवृत्ती तर एक जण बडतर्फ)
मॉब लिंचिंग प्रकरणी ज्यांना जामिन मिळाला आहे त्यांच्यासह आठ जणांना 16 एप्रिल रोजी झालेल्या घटनेत लवकरच अटक केली जाणार आहे. अन्य 48 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते त्यांनी सातत्याने महिनाभर सोशल मीडियात या घटनेचे व्हिडिओ पोस्ट केले होते. पालघर मॉब लिंचिंग घटनेचा तपास CID कडून करण्यात येत होता. मात्र भाजपने या प्रकरणाचा तपास सेंन्ट्रल ऐजन्सीकडे द्यावा अशी मागणी केली होती. पुढील आठवड्यात सोमवारी या प्रकरणाची सीबीआय चौकशीसाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.(Palghar Mob Lynching Case: पालघर मॉब लिंचींग प्रकरणामागे धार्मिक कारण नाही - उद्धव ठाकरे)
आरोपींचे वकील अमृत अधिकारी आणि अतुल पाटील यांनी असे म्हटले की, आरोपींचा मॉब लिंचिंगमध्ये कोणताही सहभाग नाही. त्याचसोबत त्यांच्यावर संशय असल्याच्या कारणास्तव त्यांना अटक करण्यात आली. तर पालघर मॉब लिंचिंब संदर्भात तीन चार्जशीट या प्रकरणी दाखल करण्यात आल्या आहेत. एकूण 238 जणांना अटक करण्यात आली असून त्यात 11 जण अल्पवयीन आहेत. त्यापैकी 77 जण आदिवासींसह 9 जण अल्पवयीन असून ते जामिनावर बाहेर आहेत. तसेच एकूण 135 जणांनी पळ काढला आहे.