पालघरच्या (Palghar) डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोर असल्याच्या संशायाने ग्रामस्थांनी तिघांची हत्या (Mob Lynching Case) केल्याची घटना 16 मार्च रोजी घडली होती. याप्रकरणी कासा पोलीसांनी 110 आरोपींना अटक केली होती. हत्याकांड प्रकरणातील अटकेत असणाऱ्या आरोपींपैकी जवळपास 22 आरोपींना वाडा पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. यावेळी अटक करण्यात आलल्या आरोपींची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यामधील एका आरोपीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता प्रशासनाची देखील तारंबळ उडाली आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाबाधीत आरोपीच्या संपर्कात आलेल्या एकूण 43 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. यात पोलीस अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
एप्रिल महिन्यात पालघरमध्ये झालेल्या मॉब लिंचिंगच्या घटनेनंतर सर्वत्र त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली होती. या आरोपींना न्यायालयाने सर्वांना पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र, या सर्व आरोपींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यावेळी वाडा पोलीस ठाण्यात असलेल्या एका आरोपीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी रात्री उशिरा याबाबतचा अहवाल प्राप्त झाला. पालघर जिल्हा शल्य चिकित्सक कांचन वानेरे यांनी याबाबची माहिती दिली. या आरोपीच्या संपर्कात 43 जण आले आहेत. यात पोलीस अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. या सर्व व्यक्तींना क्वारंटाईन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच इतर संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोधही आरोग्य यंत्रणा घेत आहे. हे देखील वाचा- Coronavirus: नांदेड मधील गुरुद्वारा लंगर साहिब येथे राहणाऱ्या 20 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह
16 एप्रिल रोजी पालघरमधील दाभाडी-खानवेल मार्गावर नाशिककडून येणाऱ्या एका वाहनाला ग्रामस्थांनी रोखले होते. या प्रवाशांची विचारपूस पूर्ण ऐकून घेण्याच्या आतच ग्रामस्थांनी दगडफेक करायला सुरुवात केली. या मारहाणीमध्ये चालकासह दोन प्रवाशांचा मृत्यू झाला होता. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच पोलिसांचा मोठा फौजफाटा पोहोचला होता. दरम्यान, संतप्त ग्रामस्थांनी पोलिसांच्या गाडीवरही दगडफेक केली होती.