शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज पालघरच्या बोईसरमध्ये (Boisar) सभा झाली. पालघर लोकसभा मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडींच्या (Bharati Kamadi) प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. ही सभा संपल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी बोईसर ते वांद्रे लोकलने प्रवास केला. सभा आटोपल्यानंतर उद्धव ठाकरे कारने बोईसर रेल्वे स्थानकावर पोहचले. उद्धव ठाकरे येताच कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी करत उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेना नेते संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर हे देखील होते. (हेही वाचा - Vishal Patil and Sangli Congress: सांगली काँग्रेस तालुका कार्यकारिणी बरखास्तीचा ठरवा, विशाल पाटल यांच्या उमेदवारीवरुन गुंता वाढला)
पाहा व्हिडिओ -
पक्षप्रमुख मा श्री उद्धवसाहेब ठाकरे यांचा बोईसर ते वांद्रे लोकल प्रवास !❤️🚩@AUThackeray @uddhavthackeray @AGSawant @prabhu_suneel @Subhash_Desai @AmolGKirtikar pic.twitter.com/W8fPS3PxRl
— Dr.Hemchandra Samant (@HemchandraSam) April 12, 2024
दरम्यान बोईसर येथील सभेदरम्यान उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. 'नकली शिवसेना ही तुमची डिग्री आहे का?,' असा सवाल करत त्यांनी मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले की, 'यापुढे मी जी टीका करणार आहे ती पंतप्रधानांवर नाही तर नरेंद्र मोदी यांच्यावर करणार आहे. कारण देशाच्या पंतप्रधानांचा मी अपमान करू शकत नाही. त्याचसोबत, यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील टीका केली. ते म्हणाले की, 'मुलाची उमेदवारी जाहीर करू शकत नाही. तुम्हाला संपवायला लावलं आहे. तुम्हाला कळलं नाही.' ते म्हणाले, 'महाराष्ट्राच्या हक्काचं कोणाला ओरबडू देणार नाही.
लोकलमध्ये उद्धव ठाकरे यांनी लोकलमध्ये विंडोसिटवर बसून प्रवास केला. त्यांच्या शेजारी संजय राऊत बसले होते. लोकलमध्ये देखील कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेना नेते संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर हे देखील होते.