पालघर (Palghar) तालुक्यामध्ये पुन्हा भूकंपाचं सत्र पुन्हा सुरू झालं आहे. आज शनिवार (26 ऑक्टोबर) पहाटे पालघर तालुक्यामध्ये भूकंपाच्या धक्क्याने डहाणू, कासा, तलासरी या भागामध्येही भूकंपाचे धक्के बसले आहे. आज पहाटे जाणवलेले भूकंपाचे धक्के सौम्य असल्याने वित्तहानी अथवा जीवितहानी झालेली नाही. मात्र अचानक भूकंप जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. नक्की वाचा: पालघर 4.3 रिश्टल स्केलच्या भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं, आजतागत सर्वात मोठा भूकंपाचा धक्का
पालघर तालुका आज सकाळी 5 भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला आहे. पहाटे दोन सौम्य धक्के जाणवले. या भूकंपामुळे कासा, चिरोटी, पेठ, शिसने, आंबोली हापरिसर हादला. पाहटे चारच्या सुमारास हे भूकंपाचे धक्के जाणवले. तर शुक्रवारी रात्री 1 ते 2.5 रेश्टल स्केलचे पाच भूकंपाचे धक्के जाणवले. सर्वाधिक तीव्रतेचा भूकंप 2.9 रिश्टल स्केलचा आहे. मागील काही महिन्यांपासून सतत पालघरमध्ये भूकंप जाणवत आहेत. हा भाग भूकंप प्रवण असल्याने अनेक नागरिकांनी स्थलांतराचा निर्णय घेतला आहे.
सध्या अरबी समुद्रामध्ये क्यार चक्रीवादळ सध्या घोंघावत आहे. त्यामुळे रविवार 27 ऑक्टोबर पर्यंत वादळाचा आणि पावसाचा धोका गोव्यासह पश्चिम किनारी असलेल्या गावांना कायम आहे.