Palghar Earthquake (Photo Credits: Twitter)

 Palghar Earthquake:  पालघरमध्ये (Palghar) आज पुन्हा भूकंपाचे धक्का (Earthquake Tremors) बसला आहे. सकाळी 11 वाजल्याच्या सुमारास पालघर तालुक्यामध्ये सुमारे 4.3 रिश्टल स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले. हा धक्का पाच मीटर खोल असल्याची माहिती देण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने पालघरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवत आहे. महिन्याभरापूर्वी पालघरमध्ये एका दिवसात 6 भूकंपाचे धक्के बसले होते. यामध्ये सुरक्षेचा उपाय म्हणून घराबाहेर पडताना एका चिमुकलीचा जीव गेला होता.

मध्यरात्रीपासून पालघरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. यामध्ये भिंतींना  तडे गेले आहेत. तसेच सध्या महाराष्ट्रामध्ये दहावी आणि बारावीची परीक्षा सुरू असल्याने अफवांवर विश्वास न ठेवता दक्षता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मागील काही महिन्यांपासून पालघर, डहाणू, तलासरी या भागामध्ये भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. आनंतर धास्तावलेल्या अनेक पालघरकारांनी स्थलांतराचा निर्णय घेतला आहे.पालघरमध्ये जव्हार,डहाणू, विक्रमगड हे भाग भूकंपप्रवण क्षेत्रामध्ये येतात.