Mumbai News: CSMT रेल्वे स्थानकावर संतापजनक घटना, महिलेचा लैंगिक छळ; रेल्वे कर्मचाऱ्याचा खोटा दावा करणाऱ्याला अटक
Molestation | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Mumbai News:  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सीएसएमटी येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे.रेल्वे स्टेशनवरील नीलम फूड कॅन्टीनमध्ये काम करणाऱ्या एका 30 वर्षीय व्यक्तीने 18 वर्षाच्या महिलेचे विनयभंग केल्याची संतापजनक माहिती समोर येत आहे. पीडित महिला झारखंड येथील रहिवासी आहे. मुरलीलाल गुप्ता असं आरोपीचे नाव आहे. या घटनेची माहिती पीडितेने रेल्वे पोलिसांना दिली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. (हेही वाचा- मुंबई लोकल मध्ये योगा टीचरचा विनयभंग; 28 वर्षीय आरोपी अटकेत

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रेल्वे स्टेशनवर मंगळवारी घडली आहे. पीडित महिला आणि तिचा पती सोमवरी रात्री लांब पल्ल्याच्या ट्रेनने प्रवास करायचा होता.त्यासाठी मंगळवारी मध्यरात्रीनंतर ते सीएसएमटी येथे थांबले. गळ्यात ओळखपत्र असलेले रेल्वे कर्मचारी म्हणून त्यांच्याकडे  गुप्ता हे जोडंप गेले होते. त्यावेळी खोटा दावा करत त्यांनी सांगितले मी रेल्वे कर्मचारी आहे. पुरुष आणि महिला यांची वेगळी तपासणी केली जाईल. पुरुषाला पुरुशांच्या वेटिंग रुममध्ये तपासणीसाठी पाठवले, तर महिलेला दुसऱ्या रुममध्ये पाठवले.

महिलेला तपासणीच्या बहाणे घेऊन गेला त्यावेळीस त्याला अयोग्यरित्या स्पर्श केला आणि थोड्यावेळाने तो पळून गेला. या घटनेची माहिती पीडित महिलेने पोलिसांना देण्यात आले. महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी तिचे जबाब नोंदवला. रेल्वे प्लॅटफॉर्मवरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यावेळी आरोपी कॅन्टीनमधील कर्मचारी असल्याचे समोर आले. मुरलीलाल गुप्ता यांना अटक करण्यात आले आहे. या घटनेनंतर रेल्वे स्टेशनवर एकच खळबळ उडाली आहे.