PM Narendra Modi | (File Image)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 1 ऑगस्ट दिवशी पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार (Lokmany Tilak National Award) स्वीकारण्यासाठी येणार आहे. त्यासाठी पुण्यात तयारी देखील झाली आहे. मात्र यावर कॉंग्रेसने आक्षेप वर्तवला होता. कॉंग्रेस सोबतच आता राज्यात इतर विरोधी पक्ष देखील आपला विरोध दर्शवणार आहेत. काही सामाजिक संघटनांनी देखील मोदींना पुरस्कार देण्यास विरोध करत त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवणार असल्याचं म्हटलं आहे.

डॉक्टर बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्ष आणि सामाजिक संघटना पुण्यातील अलका चौकात मोदींना काळा झेंडा दाखवणार आहेत. ्याचे नियोजन करण्यासाठी पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये विरोधीपक्ष आणि सामाजिक संघटनांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे वृत्त आहे. दरम्यान मोदींच्या या पुरस्कार सोहळ्याला शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे हजेरी लावणार आहेत पण विरोधक दुसरीकडे काळे झेंड दाखवण्याच्याही तयारीत आहेत. Sharad Pawar च्या हस्ते PM Narendra Modi यांचा 1 ऑगस्टला 'लोकमान्य टिळक पुरस्कार' देऊन गौरव करण्यावर 'INDIA' चे काही नेते नाराज .

लोकमान्य टिळकांच्या विचारसरणीशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार जुळत नसल्याचे सांगत स्थानिक कॉंग्रेसने त्यांना हा पुरस्कार देण्यास नाराजी बोलून दाखवली आहे. परंतू काँग्रेस नेते रोहित टिळक मोदींच्या नावावर ठाम आहे. ज्या संस्थेकडून पुरस्कार दिला जातो त्या संस्थेचे रोहित टिळक हे विश्वस्तही आहेत.

पुण्यात पंतप्रधान मोदी श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरामध्येही अभिषेक करणार आहेत. तसेच पुणे मेट्रोच्या दोन महत्वाच्या मार्गिकांचं उद्घाटन देखील करतील.