महाराष्ट्रातील पोलीस (Maharashtra Police) अधिकार्यांच्या बदल्या आणि पदस्थापनासंदर्भातील अहवाल लीक केल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadanvis) रविवारी चौकशी केली. सकाळी 12 ते 2 या वेळेत फडणवीस यांची चौकशी करण्यात आली. या चौकशीला भाजपकडून (BJP) तीव्र विरोध झाला होता. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) फडणवीसांना पाठवलेल्या नोटिसा राज्यभर पेटल्या होत्या. या चौकशीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर राज्य सरकार आणि पोलिसांवर त्यांनी गंभीर आरोप केले. या झालेल्या रविवारच्या चौकशीनंतर आज पुन्हा भाजप विधानसभेत सरकारला घेरण्याची शक्यता आहे. तसेच या भाजपच्या विरोधावार सरकार कश्या प्रकारे प्रतिउत्तर देणार हे पाहणे ही महत्वाचे असणार आहे.
सरकार विरोधात अजुन बाॅम्ब विधानसभेत फुटणार
भाजप प्रदेशध्यक्ष चंद्रकात पाटील म्हणाले आहे की हे विधानसभेचे हे आधिवेशन अजुन 9 दिवस चालणार आहे. त्यामुळे सरकारने या विधानसभेतील 9 दिवसावर लक्ष द्यावे. देवेंद्र फडणवीस हे खेळाडु आहेत सरकारने त्यांचा विचार कारावा. तीन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी टाकलेला पेन ड्राईव्ह बॉम्ब हे हिमालयाचे एक छोटेसे टोक आहे. सरकारला अजून 9 दिवस अधिवेशन चालवायचे आहे. आता आणखी बॉम्ब सरकारविरोधात बाॅम्ब फुटणार आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी अटकेत असलेले राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आजही आक्रमक राहण्याची शक्यता आहे. मलिकांच्या राजीनाम्याची मागणी भाजपने लावुन धरली आहे. (हे ही वाचा Nana Patole: सोनिया गांधीना हे सरकार अजिबात मान्य नव्हतं, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस महाविकास आघाडीसोबत - नाना पटोले)
फडणवीस यांची चौकशी राजकीय सूडबुद्धीने
पोलिसांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांंची रविवारी दोन तास चौकशी केली. भाजपने या चौकशीवर नाराजी व्यक्त करत राज्यभर सरकारविरोधात आंदोलन केले. तसेच फडणवीस यांच्या राहत्याघरी पोलिसांचा मोठा फौजफाट पाहायला मिळाला. भाजपकडून सरकारवर मोठ्या प्रमाणे आरोप करण्यात आले. तसेच फडणवीस यांची चौकशी राजकीय सूडबुद्धीने करण्यात आली असा आरोप भाजपने सरकारवर केला आहे. दरम्यान यावर सरकारने उत्तर देत असे म्हटले आहे की फडणवीस यांना सहा वेळा नोटीस बजवण्यात आली होती पण त्याच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया न मिळाल्याने पालिसांनी त्यांच्या घरी जावून जबाब नोंदवला.