Most Vegan Friendly City Award: मुंबईला मोस्ट व्हेगन-फ्रेंडली सिटी पुरस्कार देण्याच्या निर्णयावर विरोधी पक्षाचे नगरसेवक नाराज, पुरस्कार परत करण्याची केली मागणी
Kishori Pednekar | (Photo Credit: Twitter/ANI)

मुंबईला मोस्ट व्हेगन-फ्रेंडली सिटी (Most vegan-friendly city) म्हणून सन्मानित करण्याच्या PETA च्या (People for the Ethical Treatment of Animals) निर्णयावर विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी टीका केली आहे. PETA इंडियाने शुक्रवारी संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथील BMC मुख्यालयात महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांच्याकडे हा पुरस्कार सुपूर्द केला. असे पुरस्कार स्वीकारून महापौर शाकाहारी पदार्थांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप नगरसेवकांच्या एका गटाने केला आहे. हेही वाचा Amravati Violence: अमरावतीमध्ये कलम 144 लागू, हिंसाचाराबाबत खासदार Navneet Rana यांचे शांततेचे आवाहन- 'संजय राऊत आणि पालकमंत्र्यांनी घटनेचे राजकारण करू नये' (Watch Video)

मुंबई हे विविध खाद्य संस्कृतीतील लोकांचे घर आहे. शाकाहाराचा गौरव करणारे पुरस्कार स्वीकारल्याने मांसाहार करणाऱ्या लोकांच्या भावना दुखावतील. महापौर अशा पुरस्कारांचे समर्थन करत असतील, तर सर्व मच्छिमारांना मासळी विक्रीवर बंदी घालावी. शहरातील समृद्ध सांस्कृतिक आणि खाद्य वैविध्य लक्षात घेऊन तिने हा पुरस्कार परत केला पाहिजे, असे समाजवादी पक्षाचे नगरसेवक रईस शेख (Samajwadi Party corporator Raees Sheikh) म्हणाले.

महापौरांनी पुरस्कार स्वीकारण्याच्या निर्णयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनही टीकेची झोड उठली आहे. उल्लेखनीय म्हणजे, काही वर्षांपूर्वी मनसेच्या नगरसेवकांनी केवळ शाकाहारी लोकांना फ्लॅट विकताना बिल्डरांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यांच्या या निर्णयाचा बचाव करताना पेडणेकर म्हणाल्या, हा पुरस्कार स्वीकारून एकाही खाद्यसंस्कृतीला चालना मिळाली नाही. या पुरस्कारासाठी मी पेटा इंडिया आणि मुंबईकरांचे आभार मानते.