प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Instagram )

तळोजा (Taloja), खारघर (Kharghar), कळंबोली (Kalamboli), घणसोली (Ghansoli) आणि द्रोणागिरी (Dronagiri) भागातील सिडकोची (CIDCO) 1100 घरं शिल्लक आहेत. या शिल्लक असलेल्या घरांसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु झाली आहे. 31 जानेवारीपर्यंत या घरांसाठी अर्ज करता येणार आहे.

ऑगस्ट महिन्यात 14,838 घरांसाठी सिडकोने सोडत काढली होती. ही घरे अल्प उत्पन्न गट आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी होती. यातील 1100 घरे शिल्लक आहेत आणि त्यासाठी 1 ते 31 जानेवारीपर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. ही घरे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र अर्जदारांसाठी आहेत. यातील अटीनुसार पात्र असणाऱ्या अर्जदारांना ही घरे वितरीत करण्यात येतील. सिडकोच्या घरधारकांना दिलासा, घरं आणि कमर्शिअल प्रॉपर्टी Lease Hold ऐवजी Free Hold करण्याचा निर्णय

घरांसंबंधित सर्व माहिती आणि ऑनलाईन अर्ज सिडकोच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. यासाठी खास मोबाईल अॅपही लॉन्च करण्यात आले आहे. 31 जानेवारीपर्यंत या घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यात येणार असून 14 फेब्रुवारीला या घरांसाठी सोडत काढण्यात येईल.