प्रभादेवीतील सिद्धिविनायक मंदिराची (Siddhivinayak Temple) ख्याती जगभर आहे. त्यामुळे आपल्या लाडक्या गणरायाच दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक देश-विदेशातून सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी मुंबईत येतात आणि फुल ना फुलाची पाकळी सिद्धिविनायका चरणी अर्पण करतात. मात्र सिद्धीविनायकाच्या एका निनावी भक्ताने गणपती चरणी 35 किलो सोन्याचे दान केल्याचे समोर आले आहे. या दानामध्ये सोन्याचा दरवाजा, सोन्याचा घुमट यांचा समावेश आहे. त्यामुळे सर्वच भक्तांसाठी हा कुतूहलाचा विषय ठरला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सिद्धीविनायकाचे मंदिर शिंदूर लेपनासाठी बंद होते. या दरम्यान नवस पूर्ण झालेल्या एका भाविकाने विघ्नहर्त्याच्या चरणी 35 किलो सोनं दान केलं आहे. या सोन्याची किंमत 14 कोटींच्या घरात आहे. गणपती बाप्पाच्या चरणी एवढं सोनं चढवणाऱ्या भक्ताची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे. भक्ताने दिलेल्या या सोन्याच्या दानातून मंदिराचा गाभारा, घुमट, दरवाजा यासह इतर गोष्टींना सोन्याचा मुलामा देण्यात आला आहेत.
Mumbai: new look of Siddhivinayak Temple
💐💐💐@NBTMumbai @CaptSunderChand @MumbaiPolice @SrBachchan @hvgoenka pic.twitter.com/UHjwPGfbyR
— Manish Jha (@nbtmanish) January 20, 2020
हेदेखील वाचा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून साईबाबा जन्मस्थळाबाबतचे वक्तव्य मागे; शिर्डी-पाथरी वादावर पडदा
दिल्लीतील एका भक्ताने हे सोनं बाप्पाच्या चरणी दान केल्याची माहिती मिळत असून ज्याची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे. बाप्पाचं हे गोंडस आणि डोळ्याचे पारणे फिटणार रुप पाहून भक्तांचं मन प्रसन्न झालं आहे. बाप्पाचा सोनेरी घुमट पाहण्यासाठी भक्तांची एकच गर्दी केली आहे. दूरवरुन भक्त लाडक्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आले आहेत.
भक्तांचे आराध्य दैवत मानल्या मुंबईतील सिद्धीविनायका चरणी जवळपास 14 कोटींचे सोनं दान करणं ही साधीसुधी गोष्ट नाही. यामुळे लवकरच सिद्धीविनायक मंदिराचा लवकरच देशातील सगळ्यात श्रीमंत मंदिराच्या यादीमध्ये समावेश होणार असल्याचे संकेत मिळत आहे.