Sangali Crime News: सांगलीत एका विद्यार्थ्याची हत्या (Murder) करण्यात आली आहे. या धक्कादायक घटनेमुळे सांगली परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. कॉलेजमध्ये झालेल्या किरकोळ वादातून तरुणाची हत्या करण्यात आली आहे. जिल्ह्यातील कवठेमहांकळ परिसरात ही घटना घडली. या घटनेअंतर्गत पोलीसांनी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी कवठेमहांकाळ परिसरातील बस एसटी स्टँडवर निर्घृण हत्त्या करण्यात आली आहे. धुळा कोंडीबा कोळेकर असं हत्त्येत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगली येथील कवठेमहांकाळ परिसरातील बस एसटी स्टँडवर धारधार शस्त्रांनी तरुणावर वार केला. शनिवारी दुपारी एसटी स्टँडवर घरी येणास उभा होता तेव्हा ही घटना घडली. हल्लेखोरांनी त्याच्यावर कोयता आणि अन्य धारदार शस्त्रांनी जखमी केलं, या हल्लेत त्याचा मृत्यू झाला. हल्ले खोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. भरदिवसा ही घटना घडली त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. स्थानिकांनी जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात नेलं. तो पर्यंत त्याचा मृत्यू झाला.
नातेवाईकांना या घटनेची कल्पना दिली. नातेवाईकांनी पोलिसांकडे आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली. पोलीसांना या घटनेची नोंद घेतली. तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. किरकोळ कारणांवरून तरुणाची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसर हादरलं आहे.