Balasaheb Thackeray Jayanti 2020: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त पहा त्यांची गाजलेली भाषणे (Video)
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Photo Credits-Facebook)

Bal Thackeray Jayanti Famous Speech: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची उद्या (23 जानेवारी) जयंती साजरी करण्यात येणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा जीवन प्रवास हा व्यंगचित्रकार, पत्रकार ते शिवसेना प्रमुख पर्यंतचा नेहमीच लक्षात राहणारा आहे. एवढेच नाही तर बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या पाठी खंबीरपणे उभे राहत त्यांच्या हक्कासाठी झटले. 1996 पासून ते पक्षाची स्थापना झाल्यानंतर 2012 पर्यंत त्यांनी पक्षाची कमान सांभाळली होती. ठाकरे परिवाराचा आणि राजकरणाचा संबंध हा अगदी जवळचा असून महाराष्ट्राच्या राजकरणात त्यांचे मोठे योगदान आहे.

बाळासाहेबांचा राजकरणातील सहभाग हा नेहमीच सक्रीय होता. महाराष्ट्रासाठी त्यांनी राजकरणाची अनेक चक्रे फिरवलीच पण अद्याप शिवसेनेचा दबदबा राज्यात कायम आहे. लाखो शिवसैनिकांचा पाठींबा बाळासाहेबांना होता पण हा आधार टिकवून ठेवणं हे काम त्यांनी नेहमीच केले. तसेच ठाणे हे माझे आवडते शहर असल्याचा उल्लेख बाळासाहेबांनी त्यांच्या भाषणातून केला होता. या ठाण्याने शिवसेनेचा पहिला झेंडा फडकविला, तर पहिला नगराध्यक्ष ही ठाण्यातून निवडणून आल्याचा अभिमान बाळासाहेबांनी त्यावेळी व्यक्त केला होता.त्यामुळे कोणतीही सभा घेण्यापूर्वी मी ठाण्यात येऊन नंतरच शिवतीर्थीवर जातो असे छातीठोकपणे जमलेल्या तमाम शिवसैनिकांना संबोधून सांगितले.तर बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त त्यांची काही गाजलेली भाषणे आपण पाहूयात.(Balasaheb Thackeray Birth Anniversary: मराठी माणसाचा कणा- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे)

>>शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची गाजलेली भाषणे

बाळासाहेब ठाकरे यांचे ठाणे येथील शेवटचे तडफदार भाषण ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने शिवसैनिकांनी उपस्थिती लावली होती. या भाषणादरम्यान बाळासाहेबांनी विरोधी पक्षनेत्यांवर जोरदार टीका केली होती.

31 मे 20000 मध्ये ष्णमुखानंद हॉलमध्ये बाळासाहेबांचे भाषण होते. त्यावेळी त्यांच्यासोबत मच्छिंद्रनाथ, गोपीनाथ मुंडे यांची सुद्धा उपस्थिती दिसून आली होती. या भाषणावेळी त्यांनी त्यांचा जीवनप्रवासासह आणि वडिलांचा ठेवा याबाबत अधिक स्पष्ट केले आहे.

बाळासाहेबांचे बहुतांश भाषणे ही शिवतीर्थावर म्हणजेच शिवाजी पार्कवर व्हायची. अशाच एका भाषणावेळी शिवसेनेला मिळणारा उत्स्फुर्त प्रतिसाद आणि महाराष्ट्र धर्माचा मुद्दा याबाबत बाळासाहेबांनी या भाषणातून अधोरेखित केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांना स्फुर्तिस्थान मानून शिवसेनेने नेहमीच त्यांचे कार्य केले आहे. विधानसभा निवडणूकीत विजय झाल्यानंतर त्याचा शपथविधी सोहळा हा शिवतीर्थावरच होणार असे वचन बाळासाहेबांनी शिवसैनिकांना दिले होते.

बाळासाहेब यांनी सामना हे शिवसेना मुखपत्र सुरु केल्यावर त्यांची खुमासदार लेखन शैली प्रकर्षाने समोर आली होती. एका अग्रलेखात त्यांनी मित्रपक्ष भाजपा आणि सेनेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यावर सुद्धा निशाणा साधला होता. मनोहर यांनी एका सभेत बोलताना भाजपा आणि शिवसेना हे राम आणि लक्ष्मणासारखे भाऊ आहेत असे म्हंटले होते. तर 17 नोव्हेंबर 2012 मध्ये वृद्धपकाळाने बाळासाहेब यांचे निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली होती.