ओला- उबेर चालक संपावर जाणार? प्रवाशांचे पुन्हा होणार नाहक हाल
ओला उबेर टॅक्सी संप ( फोटो सौजन्य - फाइल इमेज )

गेले सहा दिवस बेस्ट संपामुळे आधीच मुंबईकर संतापले आहेत. त्यात आता ओला-उबेर (Ola-Uber) चालकांनी संपाची हाक देण्याचा इशारा दिला आहे. या संपामध्ये चालकांसह मराठी कामगार सेना ही सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे.

ओला- उबर चालकांनी गेल्या वर्षी ऑक्टोंबर महिन्यात त्यांच्या विविध मागण्या पूर्ण होण्यासाठी चक्क आठ दिवस संपाची हाक दिली होती. त्यावेळी सुद्धा मुंबईकरांचे नाहक हाल झाले होते. परंतु आता ओला-उबेर चालकांनी पुन्हा एकदा त्यांच्या मागण्यापूर्ण होण्यासाठी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. ओलाः उबेरचे भाडे 100 ते 150 रुपये करावे अशी मागणी चालकांकडून केली जात आहे. त्याचप्रमाणे प्रति किलोमीटरसाठी 18 ते 23 रुपये आकारण्यात यावे असे सांगितले जात आहे. (हेही वाचा-पुण्यातील ओला चालकाला मुंबईत मारहाण, कपडे काढून उठाबशांची शिक्षा)

तर ओला-उबर सेवा पुरवणाऱ्या कंपन्या चालकांना फक्त 2 ते 3 रुपये इन्टेंसिव देतात. तसेच कंपन्यांनी मालकांचे आयडी बंद करुन लीजवर गाड्यांना भाडे देणे सुरु केले आहे.