Shiv Sena-MNS | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

शिवसेना पक्षप्रमुख (Shivsena Party Chief) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे भाषण ज्यांना कुणाला कळलं असे त्यांनी ते लोकांना समजून सांगावे. समजून सांगणाऱ्याचा योग्य तो सन्मान केला जाईल. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena)त्या व्यक्तीस 151 रुपयांचं बक्षिस देईल अशी ऑफर मनसे नेते संदीप देशपांडे (MNS Leader Sandeep Deshpande) यांनी दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी पंढरपूर येथे जाहीर सभा (सोमवार, 25 डिसेंबर) घेतली. या सभेतील उद्धव यांच्या भाषणावर मनसेने जोरदार टीका केली आहे.

मनसेकडून 151 रुपयांचं बक्षीस

उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर बोलताना मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी भाषण केले. मात्र, या भाषणात ते नेमकं काय म्हणाले हे कोणालाच कळलं नाही. युती तुटल्यानंतर सुरुवातीला उद्धव ठाकरे म्हणाले होते की, २५ वर्षं आम्ही युतीत सडलो. सुरुवातीचा पवित्र बदलत आता ते म्हणत आहेत की, भाजपसोबत युती करायची किंवा नाही हे जनता ठरवेल. आम्हाला कोणत्या फॉर्म्युल्यात रस नाही. उद्धव यांचं बोलणं अनाकलनीय आहे. त्यामुळे जो कोणी व्यक्ती उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा अर्थ समजून सांगेन त्याला मनसेकडून 151 रुपयांचं बक्षीस दिले जाईल', असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, उद्धव ठाकरे पंढरपूर दौरा: राफेल मुद्द्यावर सरकार उत्तर का देत नाही: उद्धव ठाकरे यांचा भाजप सरकारवर हल्लाबोल)

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

पंढरपूर येथील सभेत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून विविध मुद्द्यांवर जोरदार टोलेबाजी केली. आपल्या भाषणात त्यांनी राम मंदीर, राफेल घोटाळा, कर्जमाफी, धनगर आरक्षण, यांसह अनेक मुद्द्यांवर भाष्य केल. मात्र, भाजपसोबत युती होणार किंवा नाही या बाबत बोलताना ते म्हणाले, युती होणार की नाही या फालतू प्रश्नात मी जात नाही. युती होणार किंवा नाही हे जनताच ठरवेल. युती आणि जागावाटप गेलं खड्ड्यात आगोदर शेतकऱ्यांच पाहा. दुष्काळाशी सामना करा.