3 ऑक्टोबर रोजी अकोला येथे साजरा होणार 'रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया'चा 62 वा वर्धापन दिन; रामदास आठवले यांची माहिती
Ramdas Athawale | (Photo Credits-Facebook)

3 ऑक्टोबर 1957 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (Republican Party of India) ची स्थापना केली होती. येत्या 3 ऑक्टोबर रोजी पक्षाचा 62 वर्धापन दिन अकोला (Akola) येथे साजरा होणार आहे. रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी ही माहिती दिली. शहरातील अकोला क्रीकेट क्लब च्या मैदानात हा सोहळा पार पडेल. या दिवसाचे औचित्य साधून देशभरातून पक्षाचे कार्यकर्ते अकोला येथे उपस्थित राहणार आहेत. रिपाइं ची अकोला जिल्हा कमिटी या वर्धापन दिनाचे आयोजन करणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी एका खुल्या पत्राद्वारे या पक्षाची स्थान केली होती. पुढे 1999 साली रामदास आठवले यांनी नव्याने हा पक्ष स्थापन केला. रामदास आठवलेंचा हा पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा एक स्प्लिटर गट आहे. या पक्षाची पाळेमुळे बी. आर. आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या अनुसूचित जाती महासंघामध्ये आहेत. (हेही वाचा: रामदास आठवले यांची युतीमध्ये 10 जागांसाठी मागणी; शिवसेना-भाजपा 240 जागा जिंकणार असल्याचा व्यक्त केला विश्वास)

हे मान्यवर राहतील उपस्थित –

> केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

> महोत्सवाचे अध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भूपेश थुलकर

> प्रमुख अतिथी - महाराष्ट्राचे राज्यमंत्री अविनाश महातेकर, महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष राज्यमंत्री दर्जा राजा सरवदे, रिपाइं महाराष्ट्र कार्याध्यक्ष बाबुराव कदम, दिपकभाऊ

दरवर्षी पक्षाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी या कार्यक्रमासाठी अकोला शहराची निवड करण्यात आली आहे.