विठुमाऊलीच्या ऑनलाईन दर्शनासाठी भाविकांना 100 रुपये मोजावे लागणार
विठ्ठल रखुमाई (फोटो सौजन्य-फेसबुक)

श्री विठ्ठल- रुक्मिणीच्या ऑनलाईन दर्शनासाठी भाविकांना आता 100 रुपये मोजावे लागणार आहेत. परंतु ही सुविधा भाविकांना यापूर्वी मोफत देण्यात येत होती. या नव्या देणगी आकारणीमुळे मंदिर समितीला वर्षभरात 15 कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.

शनिवारी मंदिर अध्यक्षतेखाली मंदिर समितीची बैठक बोलावण्यात आली होती. या वेळी हभप औसेकर महाराज यांनी दर्शन व्यवस्थेला 100 रुपये आकारणी करावी असे सांण्यात आले आहे. मंदिर समितीने काही वर्षापूर्वी मंदिर समितीच्या वेबसाईटवर ऑनलाइन दर्शन बुकिंग सुरु केले. त्यामुळे दर्शन बुकींग करून भाविक त्या वेळेत पंढरपूरात येत होते.

विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात. तसेच ऑनलाईन पद्धतीने ही भाविकांना विठू-रखुमाईचे दर्शन घेण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तर वर्षाभर 14 ते 15 लाख भाविक ऑनलाईन दर्शनाचा लाभ घेतात.