उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ 2019 निवडणूक निकाल:  उर्मिला मातोंडकर पिछाडीवर; काँग्रेसची उर्मिला मातोंडकर की भाजपचे गोपाळ शेट्टी यांच्यात टक्कर
Gopal Shetty and Urmila Matondkar (Archived, Edited, Representative Images)

North Mumbai Lok Sabha Constituency Election Results 2019: लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections 2019) साठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु झाली असून, निकालही हाती येण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघांपैकी एक असलेल्या उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ आणि या मतदारसघातील उमेदवारांचे मताधिक्यही हाती येत आहे. या मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar)आणि भाजपचे तगडे उमेदवार गोपाळ शेट्टी (Gopal Shetty) यांच्यात लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections 2019) साठी जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. दरम्यान, एक्झिट पोल्सनी भाजप-शिवसेना युतीला अनुकूल तर, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला प्रतिकूल अंदाज दर्शवले आहेत. या पार्श्वभूमीवर हाती येत असलेली निकालाची आकडेवारी उत्सुकता वाढवणारी आहे.

जाणून घ्या महाराष्ट्रासह संपूर्ण भारताचा निकाल एका क्लिकवर, पाहा लाइव अपडेट्स

महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान झाले त्यात चौथ्या टप्प्यात उत्तर मुंबई मतदारसंघातील मतदान पार पडले. नव्याचे राजकारणात दाखल झालेल्या उर्मिला मातोंडकर यांना या निवडणूकीत भाजपचे तगडे उमेदवार गोपाळ शेट्टी यांचे आव्हान आहे. यंदाच्या निवडणूकीत उर्मिला मातोंडकर यांनी जोरदार प्रचार केला आहे. त्यामुळे बॉलिवूडच्या या रंगिला गर्लची जादू निवडणूकीतही चालवणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

यापूर्वी अभिनेता गोविंदा देखील या मतदारसंघातून निवडणूकीसाठी उभा राहिले होते आणि खासदार म्हणून निवडणूकही आले होते.