Pune Banner PC TWITTER

Pune Banner: पुण्यात पाण्याची टंचाईमुळे लोक त्रस्त झाले आहेत. पाण्याच्या टंचाईमुळे त्रस्त झालेल्या लोकांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. पाण्याचा प्रश्न न सुटत असल्यामुळे नागरिकांनी ठिकठिकाणी निवडणूकी विरोधात बॅनर लावण्यात आले.पुण्यातील शिवाजी नगर येथील खैरेवाडी येथील ग्रामस्थांनी शनिवारी बॅनर लावले आहे. या बॅनरची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.( हेही वाचा- पुण्यात भीषण पाणी टंचाई; जोपर्यंत नळाला पाणी येत नाही तोपर्यंत मतदान न करण्याचा नागरिकांचा निर्धार)

मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणूकीचा धुराळा सर्वीकडे उडाला आहे. पुण्याच्या शिवाजीनगर परिसरात १०,००० रहिवासी त्यांच्या परिसरातील अनियमित, अपुरा आणि कमी दाबाच्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांनी प्रशासनाकडे पाणी समस्या दूर करण्याची मागणी केली. परंतु प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने आता नागरिकांनी शक्कल लढवत ठिकठिकाणी बॅनर लावले आहे. अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार करूनही पुणे महानगरापालिकेने कोणतीही उपाययोजना केली नाही असे नागरिकांनी म्हटले.

शिवाजीनगर येथे रस्तावर बॅनर लावण्यात आल्या त्यावर असे लिहले आहे की, पाणी नाही, मत नाही (No Water, No Vote') आमचा पाण्याचा प्रश्न सोडवा, नाहीतर आम्ही निवडणूकीवर बहिष्कार टाकू.अशी चेतावणी देण्यात आली आहे. १३ मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार करणाऱ्या विविध राजकिय पत्रांच्या नेत्यांना सावध केले आहे. एकाने रहिवाशींने सांगितले आहे की, पुण्यातील पाणी टंचाईमुळे लोकांची परिस्थिती दयनीय झाली आहे.