नितेश राणे wiki common

मुंबई महानगरपालिकेत स्थायी समितीला न जुमानता प्रशासनाने मुंबईत १० % पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. पाणी नियोजनाचा एक भाग म्हणून पुढील मान्सून मध्ये चांगला पाऊस होईपर्यंत मुंबईकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे असे पालिका आयुक्तांनी सांगितले आहे. अचानक घेण्यात आलेल्या मुंबईतील पाणी कपातीच्या निर्णयावर आता नितेश राणेंनी प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवसेनेवर टीका केली आहे.

नितेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून पाणी कपातीच्या निर्णयावरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. मुंबईत पाणी कपातीऐवजी टँकर माफिया आणि पाईप लाईन गळती यांच्याकडे वेळीच लक्ष दिल्यास पाणी कपातीची वेळ येणार नाही. मुंबईत पुरेसा पाणीसाठा आहे असे म्हटले आहे. सोबतच मुंबई महानगर पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचं हे अपयश आहे, सध्या मुंबई राम भरोसे असल्याचं नितेश राणे यांनी ट्विट मध्ये लिहले आहे.

 

निवासी आणि व्यावसायिक अशा दोन्ही ठिकाणी 10% पाणीकपात करण्यात येणार आहे. मुंबईच्या काही भागात यापूर्वीच पाणीकपात सुरू करण्यात आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा 16% पाणी कमी आहे. सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या तलावांमध्ये 11 लाख मिलियन लिटर पाणी आहे. पाणी बचतीसाठी आत्तापासूनच प्रयत्न न केल्यास भविष्यात हा साठा रिझर्व्हमध्ये जाण्याची शक्यता आहे.