आदित्य ठाकरे - नितेश राणे मैत्रीला 'राणे' घरातूनच विरोध; सख्ख्या भावाने यांनी ट्वीटद्वारा नाराजी व्यक्त करत समोरून वार करण्याची केली भाषा
Nilesh Rane And Nitesh Rane (Photo Credits: Facebook)

राणे विरुद्ध ठाकरे हा वाद सर्वश्रुत आहे. ज्या पक्षातून नारायण राणे यांनी राजकारणात प्रवेश केला त्या पक्षापासून अचानक वेगळे झाले हा धक्का सर्वांसाठी खूपच मोठा होता. त्यानंतर राणे विरुद्ध शिवसेना हा वाद बराच काळ रंगला किंबहुना तो चर्चेचा विषय झाला. राणे विरुद्ध ठाकरे हे दोन टोकं असून ती कधीच एकत्र येणार नाही असे वाटत असताना अचानक नितेश राणे (Nitesh Rane) यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मध्ये एक मोठा धक्का दिला. भाजप पक्षात प्रवेश करत महायुतीतील शिवसेनेचे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या खांद्याला खांदा लावून काम करायला आवडेल असे विधान केले आणि राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या, मात्र आता नितेश राणें यांच्या या भूमिकेवर आक्षेप घेत त्यांचे थोरले बंधू निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली आहे. इतकच नव्हे तर समोरून वार करण्याची भाषा देखील केली आहे.

आदित्य ठाकरें यांच्या खांद्याला खांदा लावून काम करायला आवडेल असे नितेश राणे BBC मराठीशी केलेल्या मुलाखतीत म्हणाले होते. नितेशच्या या विषयाशी मी जराही सहमत नाही असे सांगत ट्विटद्वारा त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

हेदेखील वाचा- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक2019: नितेश राणे यांची शिवसेना विरूद्ध भूमिका नरमली; आदित्य ठाकरे यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करण्याची व्यक्त केली इच्छा

निलेश राणे यांच्या या ट्विटमुळे राणे बंधूंमधील वाद चव्हाट्यावर येणार की त्याचे खापर आदित्य ठाकरे फोडले जाणार हे लवकरच कळेल.

महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभा जागांवर 21 ऑक्टोबर दिवशी मतदान होणार आहे. तर 24 ऑक्टोबरला मतमोजणी होईल. या निवडणूकीमध्ये ठाकरे घराण्यातून पहिल्यांदाच आदित्य ठाकरे निवडणूकीच्या रिंगणात उतरला आहे. तर भाजपा-शिवसेना युती असली तरीही कणकवलीमधून भाजपाने नितेश राणेंना उमेदवारी जाहीर केल्यानंतर शिवसेनेने आपला उमेदवार रिंगणात उतरवला आहे.