तीन महिन्यांपूर्वीच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर विराजमान झालेले उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे तीन दिवसांच्या सुट्टीवर गेले आहेत. यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर सडकून टीका करायला सुरुवात केली आहे. त्यात भाजपा नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी आपले टीकास्त्र सोडत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. उद्धव ठाकरेंच्या आधी एकाही मुख्यमंत्र्यांनी सुट्टी घेतल्याचं आठवत नाही. यांना येऊन तीन महिनेच झाले आहेत अशात तीन दिवस सुट्टीवर जाण्याचं कारण काय? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणता पराक्रम केला ? झेपत नसेल तर मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडा ” अशी टीका भाजपा नेते निलेश राणे यांनी केली आहे.
याचबरोबर आपण गेल्या 3 महिन्यात मुख्यमंत्र्यांचे एकही काम पाहिले नाही असेही निलेश राणे म्हणाले आहेत. सगळे निर्णय अजित पवारच घेत आहेत. राज्यात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांपेक्षा उपमुख्यमंत्री जास्त कार्यक्षमता दाखवून काम करत आहेत. मुख्यमंत्र्यांना सुट्टीवरच राहू द्यात कारण आल्यावरही ते गोट्याच खेळतील अशी बोचरी टीकाही निलेश राणे यांनी केली आहे.
हेदेखील वाचा- पिसाळलेल्या कुत्र्याला गोळी मारायचा नियम असता तर संज्या संपला असता- निलेश राणे
काही दिवसांपूर्वी निलेश राणे यांनी शिवभोजनात घोटाळा असल्याचाही आरोप केला होता. तसेच शिवसेना पुढे पुढे करून सत्तेत आली आहे. आता पुन्हा एकदा ट्विटरवरुन निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सुट्टीवर टीका केली आहे. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राहुल गांधींप्रमाणे सुट्टीवर जात आहेत. अशीही टीका निलेश राणेंनी केली.
महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिवसेनेचे (ShivSena) विधान परिषदेतील ज्येष्ठ नेते रामदार कदम (Ramdas Kadam) यांना मंत्रिपद मिळाले नाही. यावरुन रामदास कदम नाराज असल्याच्या वृत्त समोर येत आहेत. यावर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे सपुत्र निलेश राणे (Nilesh Rane) यांनी प्रतिक्रिया नोंदवत रामदास कदम यांच्यावर निशाणा साधला आहे. रामदास कदम तुम्ही संपूर्ण वेळ राणेंना शिव्या घालून ठाकरेंना खुश करण्यासाठी घालवला आणि तेच ठाकरे तुमच्यावर थुंकले, अशी घणाघाती टीका निलेश राणे यांनी केली आहे.