Skydiving | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: Pixabay)

स्कायडायव्हिंग विमानाचा अपघात (Skydiving Plane Crash) झाल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटना न्यूयॉर्क (New York) येथील नायगारा काऊंटी (Niagara County) परिसरात शनिवारी (20 जुलै) घडली. फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (FAA) च्या म्हणण्यानुसार न्यूयॉर्कमधील यंगस्टाउनमधील लेक रोडजवळ दुपारी 1 वाजण्याच्या आधी हा अपघात झाला. फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (FAA) ने दिलेल्या माहितीनुसार, न्यूयॉर्कमधील यंगस्टाउनमधील लेक रोडजवळ दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

पायलट ठार

स्कायडायव्ह द फॉल्स स्कायडायव्हिंग सेंटरद्वारे संचालित सिंगल-इंजिन सेसना 208B ने त्याचे स्कायडायव्हिंग ऑपरेशन पूर्ण केले होते. मात्र, जमिनीवर परतत असताना अपघात घडला. अपघाताच्या वेळी विमानात वैमानिक एकटाच होता. त्याचे प्राण मात्र वाचू शकले नाहीत. FAA चे प्रवक्ते टॅमी एल. जोन्स यांनी पुष्टी केली की, अपघातापूर्वी पायलट पॅराशूट ऑपरेशन करत होता. नायगारा काउंटी शेरीफ मायकेल फिलिसेट्टी यांनी सांगितले की, अपघातापूर्वी किती स्कायडायव्हर्स जहाजावर होते याबाबत अद्या पुष्टी होऊ शकली नाही. (हेही वाचा, Turkey Plane Crash Video: प्रशिक्षण दरम्यान विमानांची भीषण टक्कर, एका पायलटचा मृत्यू; विमान अपघाताचा व्हिडिओ व्हायरल)

आपत्कालीन घटना

नायगारा काउंटी शेरीफ मायकेल फिलिसेट्टी यांनी या घटनेचे वर्णन करताना अत्यंत दुर्दैवी अपघात असे म्हटले आहे. हा अपघात नेमका कोणत्या कारणांमुळे घडला हे शोधण्यासाठी तास सुरु असल्याचे म्हटले. ही इतर कोणत्याही आपत्कालीन-प्रकारच्या घटनेसारखीच आहे. कोणत्याही आपत्कालीन घटनेमध्ये प्राण वाचविले जाणे महत्त्वाचे असते. मात्र, या घटनेत आम्ही ते करु शकलो नाही. आम्हाला तेवढा वेळच मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले.

NTSB चे प्रवक्ते पीटर नूडसन यांनी CNN ला सांगितले की, नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड अन्वेषक शनिवारी घटनास्थळाला भेट देतील असे अपेक्षीत आहे. ते विमानाच्या ढिगाऱ्याची पाहणी करतील आणि विमानाचे अवशेष सुरक्षीतपणे हालवतील, असे नडसन यांनी नमूद केले.

स्कायडायव्हिंग या प्रकारात लोक पॅराशूटसह विशिष्ट उंचीवरून विमानातून उडी मारतात. त्यामुळे हा एक अत्यंत साहसी खेळ म्हणून ओळखला जातो. जिथे तुम्ही आकाशातून उडता आणि मोठ्या प्रमाणात एड्रेनालाईन सोडता. फ्री फॉलचा वेग कमी करण्यासाठी आणि नियंत्रित पद्धतीने सुरक्षितपणे उतरण्यासाठी पॅराशूट महत्त्वाचे आहे. स्कायडायव्हिंग करताना तुम्ही कोणत्याही प्रकारच्या विमानातून (विमान, हेलिकॉप्टर, हॉट एअर बलून..) उडी मारु शकता. मात्र, फ्री फॉल आणि कॅनोपी फ्लाइटच्या तंत्रात प्रभुत्व मिळविण्यासाठी तुम्हाला प्रशिक्षण आवश्यक असते.