Maharashtra Monsoon 2020 | Image Used For Representative Purpose | Photo Credits: unsplash.com

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच मुंबईसह महाराष्ट्राच्या अन्य जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून मागील 24 तासांत जोरदार पाऊस झाला. यात मुंबई-70-100 मिमी, ठाणे-नवी मुंबईत 100-120 मिमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या (IMD) अपडेट्सनुसार, येत्या 24-48 तासांत मुंबईसह (Mumbai), ठाणे (Thane), पालघर (Palghar), रायगडसह (Raigad) कोकण (Konkan) आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पावसाचा हा जोर पुढील 2-3 दिवस कायम राहणार असल्याचे हवामान विभागाचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी सांगितले आहे.

दरम्यान, पुढील 2 आठवडे पावसाचा जोर कायम राहणार असून ऑगस्ट अखरेपर्यंत राज्यात समाधानकारक पाऊस होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. तसेच या काळात कोकणात पाऊस चांगला सक्रिय राहिल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यासोबतच पुण्यात झालेल्या सततच्या पावसामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणा-या धरणांमध्ये समाधानकारक वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. Maharashtra Monsoon Update: मुंबईसह महाराष्ट्रात ऑगस्ट अखेरपर्यंत समाधानकारक पाऊस पडण्याची शक्यता- IMD

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने तुळशी, विहार ही तलावं ओव्हरफ्लो झाली. तसंच तलावातील पाणीसाठा 60.17% इतका झाला आहे. त्यामुळे मुंबईवरील पाणीकपातीचे संकट टळण्याची चिन्हं दिसू लागली आहेत.