नवी मुंबईत राहणाऱ्या नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन हे करण्यात आले आहे. कारण नवी मुंबईतील काही शहरांमध्ये शुक्रवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे आदल्या दिवशीच जास्त पाण्याचासाठा करून ठेवावा असं आवाहन सिडकोमार्फत करण्यात आलं आहे. नवी मुंबईतील खारघर, तळोजा, उलवे, द्रोणागिरी, जेएनपीटीत येथे पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी संपूर्ण दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शनिवारी दिवसभर कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. (हेही वाचा - Mumbai Local: मध्य रेल्वेच्या दादर स्थानकावरील सर्वात घातक प्लॅटफॉमची रुंदी वाढवणार)
हेटवणे धरणातून नवी मुंबईला होतो पाणी पुरवठा केला जातो. जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीच्या कामामुळे पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे. जलवाहिनीवरील देखभाल तसेच दुस्स्कीचे काम हाती घेण्यात आले आहे. जलवाहिनीवरील सर्व गावांसह द्रोणागिरी, जेएनपीटी, उलवे, खारघर, तळोजा येथे पाणीपुरवठा खंडित केला जाणार आहे. त्यामुळे 24 तास कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
सिडकोतर्फे हेटवणे जलशुद्धीकरण केंद्र, जलवाहिनीवरील देखभाल तसेच दुस्स्कीचे काम हाती घेण्यात आले आहे. प्रभावित परिसरातील नागरिकांनी पाण्याचा साठा करून, या कालावधी दरम्यान पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.