Mucormycosis | (File Image)

कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेत सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्रातील (Maharashtra) कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी घट होत असल्याचे दिसत आहे. राज्यातील कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात राज्य सरकारला यश येत असताना राज्यासमोर आता नव्या आजाराचे संकट उभे ठाकले आहे. राज्यात सध्या म्युकरमायकोसिस (Mucormycosis) रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. म्युकरमायकोसिस आजारामुळे मुंबई (Mumbai), पुणे (Pune), नागपूरसह (Nagpur) 7 जिल्ह्यात भयंकर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यातील नागरिकांनी अधिक सुरक्षित राहणे गरजेचे आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. परिणामी, राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होत असल्याचे दिसत आहे. परंतु, आता राज्यासमोर नवे संकट उभे राहिले आहे. राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये म्युकोरमायसिसने शिरकाव केलेला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 2 हजारांहून अधिक म्युकरमायकोसिस रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 213 रुग्ण बरे झाले आहेत. तर, यामुळे 120 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या दीड हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहे. दरम्यान, मुंबई, पुणे, नागपूर, नांदेड, अहमदनगर, सांगली औरंगाबाद आणि लातूर जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे अधिक रुग्ण आढळून येत आहेत. महत्वाचे म्हणजे, या आजारामुळे राज्यात सर्वाधिक मृत्यू पुण्यात झाले आहेत. त्यानंतर नांदेड जिल्ह्याचा क्रमांक लागतो. या संदर्भात न्यूज 18 लोकमतने माहिती दिली आहे. हे देखील वाचा- Mucormycosis In Maharashtra: म्युकर माइकोसिस आजारासंदर्भात मंत्रालयात पार पडली महत्त्वाची बैठक; राज्यात आजार आता Notified Disease

म्युकरमायकोसिस या आजाराला महाराष्ट्र शासनाने नोटीफाईबल डिसीस म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक रुग्णाची नोंद घेतली जाणार आहे. म्युकरमायकोसिस आजाराच्या जाळ्यात अडकलेल्या रुग्णांवर महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचार केले जणार असल्याची माहिती, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. तसेच यासाठी राज्यभरात 131 रुग्णालय नोटफाईट करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. राज्यात आढळलेल्या रुग्णांपैकी 1 हजार रुग्णांपैकी 220 रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले होते.