NCP Party Symbol: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचिन्ह वाद; शरद पवार आणि अजित पवार यांच्या पक्षाचे नेमके चिन्ह कोणते? घ्या जाणून
Sharad Pawar And Ajit Pawar | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Sharad Pawar and Ajit Pawar Symbol Controversy: अजित पवार यांच्या रुपात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP ) पक्षात शिवसेना प्रकरणाची पुनरावृत्ती झाली. परिणामी निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे पक्षाचे संस्थापक शरद पवार यांनाच संघटनेतून बेदखल व्हावे लागले. त्याचे पर्यावसन मूळ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्याकडे तर शरद पवार यांना नवा पक्ष स्थापन करावा लागला. दरम्यान, मूळ पक्ष आणि पक्षचिन्ह घड्याळ याबाबतचा वाद कोर्टात गेला. जो आजही प्रलंबित आहे. या पक्षाच्या चिन्हावरुन कोणतेही चित्र स्पष्ट नसल्याने मतदारांच्या मनात मात्र मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. म्हणूनच जाणून घ्या शरद पवार आणि अजित पवार यांच्या दोन स्वतंत्र पक्षांची नेमकी निवडणूक चिन्हे कोणती.

शरद पवार यांची तुतारी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विभागणी झाल्यानंतर निवडणूक आयोगाने शरद पवार यांना नवा पक्ष आणि निवडणूक चिन्हा स्थापन करण्यास सांगितले. तसेच झालेल्या मागणीनुसार आयोगाने शरद पवार गटास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असे नाव आणि त्या पक्षास तुतारी हे निवडणूक चिन्ह दिले. सध्या शदर पवार गट तुतारी चिन्ह घेऊन मैदानात आहेत. (हेही वाचा, PM Narendra Modi यांनी विलिनीकरणावरून Sharad Pawar यांना भाजपामध्ये येण्याच्या ऑफरला पहा काय दिले 'जशास तसे उत्तर')

अजित पवार यांना घड्याळ (नियम व अटी लागू)

अजित पवार यांनी केलेला दावा मान्य करत केंद्रीय निवडणूक आयोगाने मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांचे निवडणूक चिन्ह अजित पवार यांना बहाल केले. मात्र, असे असले तरी प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने त्याच्या वापरावर अनेक मर्यादा आहेत. नाही म्हणायला अजित पवार यांचा पक्ष मूळ नाव आणि चिन्हासह लोकसभा निवडणूक 2024 च्या मैदानात आहे. मात्र, जाहिराती आणि तत्सम वापर करताना या पक्षास नाव आणि चिन्हाबाबतचा वाद न्यायप्रविष्ठ असल्याने सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अंतिम राहणार आहे, असे स्पष्ट लिहावे लागणार आहे. (हेही वाचा, Lok Sabha Elections 2024: अजित पवार यांना 'कचाकचा बटणं दाबा' विधानावरील तक्रारीबाबत निवडणूक आयोगाकडून क्लिन चीट)

दरम्यान, महाराष्ट्रात आतापर्यंत लोकसभा निवडणूक 2024 साठी चार टप्प्यांचे निवडणूक पार पडले आहे. राज्यातील शेवटच्या टप्प्यातील मतदान येत्या 20 तारखेला पार पडत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट निर्माण झाल्याने कार्यकर्ते आणि पक्षाच्या मतदारामध्येही संभ्रम आहे. काही पदाधिकारी, नेते कार्यकर्ते अजित पवार यांच्या बाजूने तर उर्वरीत नेते, कार्यकर्ते आणि जनता शरद पवार यांच्या बाजूने उभी असल्याचे चित्र आहे. प्रत्यक्षात मात्र जनतेच्या मनात काय आणि कोण कोणाच्या बाजूने याचा फैसला निवडणूक निकालानंतरच होणार आहे.