आमदारांची विधानभवनात छत्रपती शिवाजी महारांच्या पोशाखात एन्ट्री, असे सुनावले
राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते, आमदार प्रकाश गजभिये यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोशाखात विधानभवनात एन्ट्री केली.
राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते, आमदार प्रकाश गजभिये यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोशाखात विधानभवनात एन्ट्री केली. तसेच पोकळ आश्वासने देणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी चालते व्हा अशा असे सुनावले आहे.
तर आरक्षण, शिवस्मारक आणि कर्जमाफीच्या पोकळ आश्वासनांवर अजून कोणतीही पावले उचलली गेली नाहीत. तसेच जनतेला फक्त आश्वासने दिली गेली आहेत असे आमदार प्रकाश गजभिये यावेळी म्हणाले.
शिवाजी महाराजांच्या पोशाखात येऊन बेमूर्वतखोर सत्ताधाऱ्यांना चालते व्हा असा आदेश देत प्रश्नांकडे लक्ष वेधून घेण्याचे अभिनव आंदोलन आ. प्रकाश गजभियेंनी विधानभवनाच्या आवारात केले. आरक्षण, शिवस्मारक, कर्जमाफीच्या पोकळ आश्वासनांशिवाय जनतेला काही मिळाले नाही ही त्यांची कैफियत आहे. pic.twitter.com/nJxDPhtaJd
— NCP (@NCPspeaks) November 22, 2018
येत्या 2019 मध्ये चालते व्हा असे पत्रक त्यांनी हातामध्ये पकडले होते. मात्र आता आमदारांनी केलेल्या या आदेशाबद्दल राजकीय वातावरणात काय खळबळ उडेल हे पाहण्यासारखे असणार आहे.
(The above story first appeared on LatestLY on Nov 22, 2018 01:32 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

