शिवसेना नेते अनिल राठोड यांना निरोप देताना राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांना अश्रू अनावर
Nilesh Lanke, Anil Rathod | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

गेली 25 वर्षे आमदार म्हणून निवडूण येणारे कट्टर शिवसैनिक अशी ओळख असलेले शिवसेना (Shiv Sena) उपनेते, माजी मंत्री अनिल राठोड (Anil Rathod) यांचे बुधवारी निधन झाले. ते 70 वर्षांचे होते. अहमदनगर जिल्ह्यातील अमरधाम स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके (NCP MLA Nilesh Lanke) यांना अश्रू अनावर झाले. अनिल राठोड यांना अंतिम निरोप देण्यासाठी विविध क्षेत्रातले अनेक मान्यवर उपस्थित होते.

राठोड यांच्याबद्दल आदरांजली व्यक्त करताना आमदार निलेश लंके म्हणाले की, अनिलभैया राठोड हे आमचे दैवत होते. भर सभेत म्हटलं तर ते फोन घेत असत. सर्वांसाठीच ती एक मोठी शक्ती होती. त्यांच्या जाण्याने आम्ही पोरके झालो अशी भावना निलेश लंके यांनी व्यक्त केली.

आमदार निलेश लंके हेसुद्धा पुर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत. विधानसभा निवडणूक 2019 च्या काळात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या निवडणुकीत लंके यांना राष्ट्रवादीने तिकीट दिले आणि लंके आमदार म्हणून निवडूणही आले. त्यामुळे लंके यांचे शिवसेनेमध्ये आजही अनेकांशी भावनिक नाते असल्याचे सांगितले जाते. (हेही वाचा, Anil Rathod Passes Away: शिवसेना उपनेते, माजी मंत्री अनिल राठोड यांचे हद्यविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन)

दरम्यान, अनिल राठोड हे कडवे शिवसैनिक होते. सन 1990 पासून अहमदनगर शहर मतदारसंघातून ते सलग 25 वेळा आमदार म्हणून निवडूण येत आहेत. 1990 ते 2014 अशा एकूण पाच टर्म ते शिवसेना तिकीटावर निवडूण आले आहेत. 2014 मध्ये सत्ते आलेल्या शिवसेना भाजप युती सरकारमध्ये राठोड हे महसूल राज्यमंत्री होते. शिवसेनेचा वाघ अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने एक झुंजार शिवसैनिक गमावला अशी भावाना व्यक्त होत आहे.