शरद पवार यांच्या ED चौकशीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून NCP कार्यकर्त्यांची धरपकड; नवाब मलिक म्हणाले, 'ही दडपशाही योग्य नाही'
Nawab Malik (Photo Credits: ANI)

महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकच्या घोटाळ्यात गैरव्यवहार प्रकरणी मुंबईमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्याविरूद्ध गुन्हा करण्यात आल्यानंतर आज ते ईडी न्यायालयात दाखल होणार आहेत. दुपारी शरद पवार ईडी कार्यालयात दाखल होणार आहेत त्या पार्श्वभूमीवर आता मुंबई पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था चोख करण्यास सुरूवात केली आहे. दक्षिण मुंबईच्या 7 भागांमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. तसेच एनसीपीच्या कार्यालयात पोलिसांनी तपास करायला सुरूवात केली आहे. तसेच पोलिस राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची धरपकड करत असल्याचा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. आज दुपारी ईडी कार्यालयात शरद पवार दाखल होणार याच्या निषेधार्थ महाराष्ट्रभर निदर्शन केली जातं आहेत. शरद पवार यांच्यावरील ED कारवाईच्या निषेधार्थ  जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया; 'मी जातोय माझ्या विठ्ठलासाठी'.  

नवाब मलिक यांनी मुंबई पोलिसांकडून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची होत असलेली धरपकडीचा निषेध केला आहे. तसेच भाजप सरकार अंमलबजावणी संचलनालय यांचा गैर वापर करत असल्याचा आरोप केला आहे. आज दुपारी 2 च्या सुमारास शरद पवार बलार्ड पिअर येथील ईडी कार्यालयात दाखल होणार आहेत. मुंबईसह त्याच्या निषेधार्थ बारामती, कोल्हापूर, मराठवाडामध्ये नागरिकांनी निषेध नोंदवला आहे.

काल पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांनी 'आजवर आपण दिल्लीच्या तख्तासमोर कधीच झुकलो नाही. दिल्लीच्या तख्तासमोर झुकण्याचे संस्कार आमच्यावर झाले नाहीत. त्यामुळे दिल्लीच्या तख्तासमोर आपण कधीच झुकलो नाही', असे म्हटले होते.