Nawab Malik (Photo Credits: Twitter)

राज्यात कोरोना व्हायरसचे (Coronavirus) वाढते संकट उभे असताना रेमडेसिवीर इंजेक्शनचा (Remdesivir Injection) तुटवडा भासत आहे. यावरुन केंद्र आणि राज्य असा वाद गेल्या काही दिवासंपासून उफाळला आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. आता पुन्हा एकदा नवाब मलिक यांनी केंद्राकडून होणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या वाटपासंबंधित ट्विटच्या माध्यमातून नाराजी व्यक्त करत दिवसाला 50 हजार इंजेक्शनचा पुरवठा करण्याची मागणी देखील केली आहे.

नवाब मलिक यांनी ट्विटमध्ये लिहिले, "केंद्र सरकारने देशातील विविध राज्यांना रेमडेसिवीर इंजेक्शनच्या वाटप डेटा जाहीर केला आहे. महाराष्ट्राला दिवसाला 50 हजार इंजेक्शची गरज असून राज्य सरकारकडून तशी मागणी करण्यात आली आहे. परंतु, आतापर्यंत आम्हाला दिवसाला केवळ 36000 इंजेक्शन मिळत आहेत. नव्या वाटपानुसार, राज्याला दिवसाला केवळ 26,000 इंजेक्शन मिळत आहेत आणि त्यामुळे राज्यात कठीण परिस्थिती निर्माण होणार आहे."

नवाब मलिक ट्विट्स:

(हे ही वाचा: Remdesivir महाराष्ट्राला मिळू नये यासाठी भाजपकडून औषध कंपन्यांचे वकिलपत्र - नवाब मलिक)

पुढच्या ट्विटमध्ये मलिक यांनी दिवसाला 50 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन देऊन महाराष्ट्राच्या जनतेची गरज पूर्ण करा, अशी मागणी केली आहे. यापूर्वी अनेकदा मलिक यांनी इंजेक्शन पुरवठ्यावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला होता.