Mandakini, Eknath Khadse | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मंदाकिनी खडसे (Mandakini Khadse) यांना विशेष कोर्टाने (Special Court in Mumbai) अंतरीम जामीन मंजूर केला आहे. तसेच, मंदाकिनी खडसे यांना यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले संरक्षण मुंबई न्यायालयाने (Bombay High Court) कायम ठेवले. पुणे येथील भोसरी एमआयडीसी हद्दीतील कथीत जमीन घोटाळा आणि मनी लाँड्रिंग (Money Laundering Case) प्रकरणात हा जामीन मंजूर झाला आहे. मंदाकिनी खडसे या माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या पत्नी आहेत. याच जमीन व्यवहारावरुन एकनाथ खडसे यांच्यावर भूखंड घोटाळ्याचे आरोप झाले होते. त्यावरुन खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामाही द्यावा लागला होता. तेव्हा ते देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये सर्वात ज्येष्ठ मंत्री होते.

मंदाकिनी खडसे यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने 18 जानेवारी रोजी त्यांना ट्रायल कोर्टात जाण्याचे निर्देश दिले होते. विशेष न्यायालयाने मंगळवारी मंदाकिनी खडसे यांना जामीन अर्जाचा कालावधी निकाली निघेपर्यंत दोन आठवड्यांच्या आत 1 लाख रुपयांच्या एक किंवा दोन सॉल्व्हेंट जामिनासह वैयक्तिक बाँड सादर करण्यावर अंतरिम दिलासा दिला. (हेही वाचा, Eknath Khadse On BJP: चाळीस वर्षे भाजपसोबत राहिलो, पक्ष सोडताच माझ्या मागे ईडी लावली, एकनाथ खडसे यांची खंत)

दरम्यान, न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडू नये असे आदेशही न्यायालयाकडून मंदाकिनी खडसे यांना देण्यात आले आहेत. तसेच, जेव्हा बोलावले जाईल तेव्हा तपास अधिकाऱ्यासमोर त्यांनी हजर राहावे असे सांगण्यात आले आहे. मंदाकिनी खडसे यांचे वकिल मोहन आणि स्वाती टेकवडे यांनी तपास चालू असताना त्यांना अटक करू नये, अशी आग्रही विनंती केली होती.