Image For Representation (फोटो सौजन्य-फेसबुक)

सुशांत सिंह राजपूत प्रकरणामध्ये (Sushant Singh Rajput Case) मुंबईत ड्रग्ज रॅकेट (Drugs Racket) समोर आले. यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी धाड टाकण्याची मोहिम जणू NCB सुरु केली आहे. ANI ने दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी (Andheri) आणि खारघर (Kharghar) येथे 7 आणि 8 नोव्हेंबरला टाकलेल्या धाडीत एका ड्रग्जच्या विक्री करणा-या व्यक्तीस (Drugs Peddler) अटक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे NCB ने मालाड (Malad), अंधेरी (Andheri), लोखंडवाला (Lokhandwala), खारघर (Kharghar) आणि कोपरखैरणे (Koparkhairane) येथे देखील धाड टाकली आहे. मागील 2 दिवसांत मुंबईतील एकूण 6 ठिकाणी धाड टाकण्यात आली आहे.

NCB ने अटक केलेल्या ड्रग्ज विक्रेत्याकडून अधिकाधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याची चौकशी करून या सर्वामागचा सूत्रधार कोण हे शोधून काढण्यासाठी NCB चे प्रयत्न सुरु आहेत. NCB ने टाकलेल्या धाडीत अगदी मोक्याच्या ठिकाणांचा समावेश आहे. हेदेखील वाचा- पिंपरी चिंचवड: चाकण येथून 20 किलो ड्रग्ज साठा जप्त, पोलिसांनी 5 जणांना केली अटक

या सर्व प्रकरणामुळे मुंबईतील मोठमोठे ड्रग्ज रॅकेट समोर येण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. NCB ची मुंबईतील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी ही धाड मोहिम सुरुच असून लवकरच याच्याी मुळापर्यंत पोहोचतील अशी शक्यता निर्माण झाली आहे.

काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील लोणावळा पोस्ट ऑफिसात ड्रग्ज असलेले पार्सल जप्त केले गेले. या प्रकरणी दोन जणांना ताब्यात सुद्धा घेण्यात आले. तपासानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात या ड्रग्जची किंमत 50-55 लाख रुपये आहे. अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, मुंबई आणि अहमदाबाद येथे त्याची विक्री केली जाणार होती.