सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा CBI तपास चालू असताना त्याची गर्लफ्रेंड रियाकडून बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेट देखील उघडकीस आले. त्यामुळे मुंबईतील अनेक ड्रग्ज कनेक्शन्स देखील समोर आली. मात्र ड्रग्ज ची तस्करी न केवळ मुंबई तर पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून हा डाव मोडून काढला. या कारवाईत पोलिसांनी 5 जणांना अटक केली असून त्यांच्याकडून 20 किलोचा ड्रग्जसाठा (Drugs) जप्त केला आहे. याची किंमत सुमारे 20 कोटी इतकी आहे. या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जमध्ये मेफेड्रॉन (Mephedrone) आणि म्याव म्याव (Meow Meow) ड्रग्जचा समावेश आहे.
महाराष्ट्रात ड्रग्ज रॅकेट संदर्भातील गुन्हे उघडकीस येत असून याबाबत पोलीस कारवाई अधिकाधिक तीव्र होत आहे. त्याचदरम्यान पिंपरी चिंचडवडमध्ये एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. ज्यात तब्बल 20 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. चाकण सारख्या भागात एवढा मोठा ड्रग्ज साठा सापडणे हे खूप धक्कादायक असल्याचे सांगण्यात आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमली पदार्थ विरोधी पथकाकडून त्यांना या ड्रग्ज प्रकरणाची खबर मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचून चाकण-शिक्रापूर मार्गावर एका कारमधून ही धाड टाकली.
Police have arrested 5 people & recovered about 20 kgs of Mephedrone or Meow Meow drug from their possession in Pimpri Chinchwad, Maharashtra: Police Commissioner Krishna Prakash (08.10.2020) pic.twitter.com/2ZDnY95cdO
— ANI (@ANI) October 8, 2020
यावेळी या कारमध्ये मेफेड्रॉन आणि म्याव म्याव चे 20 किलोचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. यात 5 जणांना अटक करण्यात आली असून या आरोपींकडून अधिक तपास करत आहेत.
एकूणच ही परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील ड्रग्ज तस्करी आणि ड्रग्ज चे मोठे जाळे पसरले असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे याविरोधात कडक पाऊले उचलावीत अशी मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे.