heroine (PC - ANI)

NCB आणि भारतीय नौदलाने (Indian Navy) कोची कोस्टवर (Kochi Coast) एक मोठी कारवाई केली आहे. यादरम्यान एका इराणी बोटीतून (Iranian boat) अमली पदार्थांची (Drugs) मोठी खेप जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत लोकांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. एक निवेदन जारी करताना, एनसीबीने म्हटले आहे की भारतीय नौदलासह संयुक्त कारवाईद्वारे कोची किनारपट्टीवरील इराणी बोटीतून 200 किलो संशयित हेरॉइन जप्त करण्यात आले.  एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, बोटीवरील 6 क्रू मेंबर्सना ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच वेळी, डीआरआयने (DRI) मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mumbai International Airport) 80 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे 16 किलो उच्च दर्जाचे हेरॉईन जप्त केले.

डीआरआय मुंबईच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी ड्रग्ज लपवण्यासाठी ट्रॉलीच्या वॅगमध्ये बनावट पोकळी बनवली होती. आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. गुप्तचर माहितीच्या आधारे बुधवारी एका प्रवाशाला रोखण्यात आले आणि त्याच्या सामानाची झडती घेण्यात आली, त्यानंतर त्याच्या ताब्यातून प्रतिबंधित पदार्थ सापडला, असे अधिकाऱ्याने सांगितले. हेही वाचा Mumbai Airport: मुंबई विमानतळावर 80 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त; एकास अटक

डीआरआय अधिकाऱ्याने सांगितले की, हेरॉईन एका ट्रॉली बॅगमध्ये लपवले होते. ते म्हणाले की, केरळमधील रहिवासी असलेल्या आरोपीविरुद्ध नार्कोटिक ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स (NDPS) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.