Nawab Malik | (Photo Credits: Facebook)

महाविकास आघाडीतील विविध मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप आहेत. काही नेत्यांवर कोर्टात सुनावणी सुरु आहे, काही ईडीच्या कोठडी तर काही बेलवर. अनिल देशमुख शंभर कोटी घोटाळा, नवाब मलिक गोवावाल कंपाउंड, संजय राऊत पत्राचाळ घोटाळा, अनिल परब दापोली साई रिसोर्ट घोटाळा हे ऐकण्यातचं एक वर्ष उलटलं गेले. यापैकी संजय राऊतांना सुदैवाने बेल मिळाली, अनिल परबांवर खटला सुरु आहे तर अनिल देशमुख आणि नवाब मलिक ह्यांना मात्र याबाबत कुठलाही दिलासा मिळालेला नाही. पण नवाब मलिकाच्या केसमध्ये मोठ्या हालचाली होण्याचे संकेत आहे कारण येत्या ३० नोव्हेंबरला नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. तरी संजय राऊतांपाठोपाठ आता नवाब मलिकांना देखील जामीन मिळणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

 

नवाब मलिकांचा जामीन अर्ज मंजूर झाल्यास राष्ट्रवादीसाठी मोठी आनंदाची बातमी असणार आहे. कारण जवळजवळ एक वर्षांपासून नवाब मलिकांवर गोवावाला कंपाउंड संबंधीत खटला सुरु आहे. मलिकांच्या वकिलाकडून अनेकवेळा जामीन अर्ज दाखल केला गेला असुन न्यायालयाच्या सुनावणीत तो काहीतरी कारणास्तव फेटाळण्यात येत आहे. पण आता संजय राऊतांच्या जामीन अर्ज मंजूरी नंतर नवाब मलिकांना ही जामीन मिळणार का अशी उत्सुक राष्ट्रवादीचया कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे. (हे ही वाचा:- Sharad Pawar on Governor Koshyari: राज्यपालांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, पंतप्रधानांनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा; शरद पवार यांची मागणी)

 

मध्यांतरी नवाबांची प्रकृती हलवल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. आताही त्यांची प्रकृती फारशी बरी नसल्याचे वृत्त प्रकाशीत होतांना दिसतात. तरी मलिकांची प्रकृती बघता त्यांना न्यायालयाकडून दिलासा मिळेला का ह्याचा फैसला येत्या ३० नोव्हेंबरला होईल.