Nawab Malik | (Photo Credits: Facebook)

नवाब मलिक (Nawab Malik) यांनी अंमलबजावणी संचलनालय अर्थातच ईडीकडून (Enforcement Directorate) झालेल्या अटकेच्या कारवाईविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायालयाने तुर्तास तरी नवाब मलिक यांना कोणताही दिलासा दिला नाही. दरम्यान, याच प्रकरणाची सुनावणी आता येत्या 7 मार्च रोजी होणार आहे. ईडीने आपणास केलेली अटक बेकायदेशीर असल्याचे नवाब मलिक यांचे म्हणने आहे. मलिक यांच्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी ईडीने न्यायालयाकडे वेळ मागितला आहे.

दरम्यान, न्यायालयाने सुनावणी वेळी सांगितले की, नवाब मलिक यांच्याबाबतच्या प्रकरणावर आम्ही 7 मार्च रोजी सुनावणी घेत आहोत. मात्र, आम्ही जरी दुसरी रिमांड मंजूर केली असली तरी ती आरोपीच्या अधिकारांना धक्का न लावता वापरण्या यावी, असेही न्यायालयाने इडीला सांगितले.

ट्विट

महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने केलेल्या अटकेला आव्हान देणारी हेबियस कॉर्पस याचिका (habeas corpus petition) मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर दुपारी 2.30 वाजता सुनावणीस आली.